आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावती, बडनेरा, तिवसा मतदारसंघ झाले ‘हाय व्होल्टेज’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विधानसभानिवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच अमरावती, बडनेरा, तिवसा हे तीन मतदारसंघ ‘हाय व्होल्टेज’ झाले आहेत. या मतदारसंघांमध्ये कट्टर राजकीय शत्रूंमध्ये लढत होणार असल्यामुळे उत्सुकता ताणली गेली आहे. जिल्हातील आठही मतदारसंघांपैकी या मतदारसंघांतील लढती राज्यपातळीवर गाजण्याची शक्यता आहे.

देशमुखविरुद्धशेखावतांच्या सामन्यात गुप्तांची एन्ट्री ? :मागील निवडणुकीत माजी राष्ट्रपतीपुत्र आमदार रावसाहेब शेखावतांशी लढत देणारे डॉ. सुनील देशमुख या वेळी कोणत्या पक्षाकडून लढणार, हे अद्याप निश्चित नाही. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबतही संभ्रम कायम आहे. शेखावत यांच्या विरोधात रिंगणात उतरण्यासाठी देशमुख यांनी मोर्चेबांधणी चालवली, तर शेखावत केलेल्या विकासकामांच्या बळावर जनतेत आतापासून कौल मागत आहेत. शेखावतांनी प्रभागांमध्ये बैठकींचे सत्र जोरात चालवले आहे. त्यामुळे, वेळापत्रक घोषित होण्याअगोदरच संभाव्य लढतींबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आमदार प्रवीण पोटे, माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता, भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुप्तांचे नागपूर िदल्ली दौरे वाढल्याने पक्षातील अन्य तिकिटोत्सुक चिंतेत पडलेत.
खोडके-राणांपुढेबंड यांचे आव्हान: नवनीतराणा यांना राष्ट्रवादीने लोकसभेत उमेदवारी दिल्यापासून बडेनरा मतदारसंघ चर्चेत आला. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे खोडके दाम्पत्य राष्ट्रवादीतून बाहेर पडले. मात्र, राणांना पराभूत करण्याचे खोडकेंपुढे आव्हान आहे. वऱ्हाड विचार मंचच्या माध्यमातून खोडकेंनी जनसंपर्काला सुरुवात केली आहे. यावर्षी सुलभा खोडके निवडणूक लढणार असल्याचे जाहीर झाले आहे. शिवसेनेचे संजय बंड यांनी मागील चार वर्षांपासून या मतदारसंघात तयारी