आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीस ‘टॉप प्रायॉरिटी; सर्व विभाग दक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बाप्पांनानिरोप दिल्याचा दिवस ओलांडल्यामुळे राज्यात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते, हे गृहीत धरुन प्रशासनामध्ये निवडणूक टॉप प्रायॉरि टी दिसून येत आहे. त्यासाठी प्रत्येक विभागाने स्वत:ला दक्ष ठेवले असून आचारसंहिता लागली का, हे वाक्य आज प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळाले.
गणेश विसर्जन आटोपल्याबरोबर आचारसंहिता लागू होईल, असे गृहीतक होते. मात्र, मावळत्या शासनाचा उर्वरित कालावधी लक्षात घेता केव्हाही लागू शकते, हे तितकेच खरे. त्यामुळे प्रत्येक विभागात निवडणुकीची लगीनघाई सुरु झाली आहे.
महसूलला जास्त उत्सुकता: मतदारयादी तयार करण्यापासून ते निवडणुकीचा िनकाल घोषित करेपर्यंतची सर्वच कामे महसूल विभागाला सांभाळावी लागते. त्यामुळे आचारसंहितेच्या घोषणेची सर्वात जास्त उत्सुकता या विभागाला लागली आहे. दरम्यान िनवडणूक घोषित झाल्यानंतर करावयाची बहुतेक कामे या विभागाने अजेंड्यावर घेतली असून त्यादृष्टिने तयारी सुरु झाली आहे.