आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुती फुटली; आघाडीत झाली बिघाडी, जिल्ह्यात चौरंगी लढती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यातीलमहायुती आणि आघाडीत फूट पडल्यानंतर आता जिल्ह्यातील आठही मतदारसंघांत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीदरम्यानच उमेदवारांचा आमना-सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुती आणि आघाडीतील सलोखा तुटल्याने आतापर्यंत साथसंगत करणाऱ्या दोन्ही पक्षांचे उमेदवारच एकमेकांच्या विरोधात लढणार असल्याचे प्रारंभिक चित्र आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत सर्वत्रच चौरंगी लढती होणार आहेत. गेले काही दिवस महायुतीमध्ये जागावाटपावरून वाद सुरू असल्यामुळे एकमेकांच्या मतदारसंघात पर्यायी उमेदवारांची निवड दोन्ही पक्षांनी करून ठेवली आहे, तर आघाडीमध्येही काँग्रेस, राष्ट्रवादीने सर्वच मतदारसंघांत उमेदवारांची चाचपणी करून ठेवली होती. मात्र, शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपला आणि भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेला प्रबळ उमेदवार देताना चांगलीच दमछाक होणार असल्याचे गुरुवारी झालेल्या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. प्रसारमाध्यमांवर महायुती आणि आघाडी तुटण्याच्या वार्ता झळकत असल्याने शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयांत गुरुवारी दिवसभर उमेदवारांच्या नावांवर खल सुरू होता. जिल्ह्यातील आठही मतदारसंघांपैकी मोजक्याच मतदारसंघांत राष्ट्रवादीकडे उमेदवार आहेत, तर अशीच परिस्थिती शिवसेनेची आहे. त्यामुळे शिवसेनेचे संपर्कप्रमुख खासदार आनंदराव अडसूळ यांच्या नवसारी येथील निवासस्थानी सायंकाळी पाचनंतर बैठकांना सुरुवात झाली, तर भाजपच्या राजापेठ येथील कार्यालयात संपूर्ण दिवसभर पदाधिकाऱ्यांच्या मॅराथॉन बैठका पार पडल्या. काँग्रेसमध्ये विद्यमान आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नावाची घोषणा पहिल्या यादीत नसल्याने तर्क-वितर्क लावण्यात येत होते.
शुक्रवारपर्यंत येणार यादी
जिल्ह्यातीलआठपैकी सात मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चिन्हावर लढतील, तर बडनेरा मतदारसंघात राष्ट्रवादीचा समर्थित उमेदवार असेल. शुक्रवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील आठही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर करू. स्वबळावर लढून आम्‍ही विजयी होऊ . सुनीलवऱ्हाडे, जिल्हाध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपचे दमदार संघटन
जिल्ह्यातीलप्रत्येक तालुक्यात भाजपची संघटनात्मक बांधणी दमदार असल्याने आठही मतदारसंघांत उमेदवारीचा प्रश्न नाही. महायुती तुटली तरी आम्ही लढत देऊ आणि आठही जागा जिंकू. गावपातळीवर कार्यकर्त्यांची चांगली फळी आहे. प्रकाशभारसाकळे, जिल्हाध्यक्ष,भाजप.
नावाची छाननी झाली आहे

जिल्ह्यातीलआठपैकी चार उमेदवारांचे नाव काँग्रेसच्या पहिल्या यादीत जाहीर करण्यात आले आहे. उर्वरित चार मतदारसंघांतही काँग्रेसकडे उमेदवार आहेत. या सर्व मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार चांगली लढत देतील. या मतदारसंघात निश्चितच विजय काँग्रेसचा होईल, यात शंका नाही. बबलू देशमुख