आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्गजांच्या नामांकनामुळे पोलिसांची दमछाक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विधानसभानिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा २७ सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. शनिवारी उमेदवारांची होणारी गर्दी; तसेच महायुती आणि आघाडीतील फाटाफुटीमुळे पक्षांतर्गत निर्माण झालेला राजकीय तणाव पाहता, चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान,दिग्गजांच्या नामांकनामुळे पोिलसांची मात्र दमछाक होत आहे.
शनिवारी नामांकन दाखल करणाऱ्या िदग्गजांमध्ये अमरावती बडनेरा मतदारसंघांतील अनेक नेत्यांचा समावेश आहे. या वेळी हे सर्व उमेदवार शक्तिप्रदर्शन करणार असल्याने त्यांना आवरताना पोलिसांची चांगलीच दमछाक होणार आहे.

महायुती आघाडीमध्ये घटस्फोट झाल्याने नामांकन दाखल करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोणाला उमेदवारी मिळेल, हे अजूनपर्यंत स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अनेकांनी आजपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. प्रत्येक उमेदवार आपापले शक्तिप्रदर्शन घडवणार आहेत. एकाच दिवशी किमान सहा ते सात फेरी निघण्याची शक्यता असून, प्रत्येक फेरीला बंदोबस्त पुरवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. म्हणूनच शनिवारी ठाण्यात मोजके कर्मचारी ठेवून उर्वरित संपूर्ण संख्याबळ बंदोबस्तासाठी वापरण्यात येणार आहे. बडनेरा मतदारसंघाचे नामांकन अर्ज भातकुली तहसील कार्यालयात, तर अमरावती मतदारसंघाचे अर्ज अमरावती तहसील कार्यालयात भरले जाणार आहेत.
भातकुली तहसील परिसरात शुक्रवारी असा पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.

कडेकोट राहणार बंदोबस्त
शनिवारीनामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. यात अनेक दिग्गजांचा समावेश राहणार असल्याने मोठी गर्दी होईल. आमच्या अंदाजाप्रमाणे सहा ते सात मोठ्या फेऱ्या राहणार आहेत. या वेळी शहर पोलिसांसोबत एसआरपीएफची एक तुकडी आहे; तसेच केंद्रीय पॅरामिल्ट्री फोर्स येण्याची शक्यता आहे. सोमनाथघार्गे, पोलिसउपायुक्त.