आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फळां’च्या फांदीवर उमेदवारांच्या उड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राजे-महाराजे,समाजसुधारक संतांची नावे सातत्याने चटण्यांसारखी तोंडी लावून भाषणे ठोकणाऱ्या पक्षांच्या ‘मालकां’नीच ध्येय-धोरणे, तत्त्व बाजूला ठेवून राजसिंहासनावर बसण्यासाठी थेट ‘लाभा’च्या पदांची आमिषे दाखवणे सुरू केल्याचे चित्र प्रथमच जाहीरपणे या वेळी विधानसभेच्या निवडणुकीत दिसून येत आहे.
याचाच परिणाम जिल्ह्यातही झाला असून, स्वपक्षाने तिकीट दिले नाही म्हणून उडत्या हवेचा रोख लक्षात घेऊन अनेक असंतुष्ट उमेदवारांनी ‘लाभ’ पदरात पाडून घेण्यासाठी फळांनी लदबदलेल्या फांद्यावर उड्या मारल्याचा अनुभव जिल्हाभरातील मतदारांनी घेतला आहे. ‘अर्था’ च्या या रेसमध्ये मात्र विकास सामान्यांच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न कस्पटासारखे उडून गेले आहेत.
समाजाच्या भल्यासाठी गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज यांनी घरादारांवर तुळशीपत्र ठेवले. बाबा आमटे, अभय बंग, रवींद्र कोल्हे या पीरांनी जंगल, रस्ता नसलेली गावे गाठून खऱ्या अर्थाने समाजसेवेचे काम हाती घेतले. यांपैकी कुणालाही समाजसेवा करण्यासाठी कुणा पक्षात प्रवेश करावा, असे कधीही वाटले नाही. आघाडी-युतीची गाठ तुटल्यानंतर तिकीट पक्षाने नाकारले म्हणून पोळा फुटावा तसा असंतुष्ट उमेदवारावांनी ‘समाजसेवे’च्या व्रतासाठी तिकीट जो पक्ष देईल, त्यात प्रवेश घेतले. जिल्ह्यातील मतदारसंघातही हाच पाढा वाचला गेला. अख्खी हयात एकाच पक्षात घालून धनसंचय केल्यानंतर आता तिकीट मिळाली नाही म्हणून ‘अर्थ’कारणासाठी विविध पक्षांचे झेंडे हातात पकडल्याचे दिसून येत आहे. मागील पाच वर्षांत सत्तेत नसणाऱ्या या समाजसुधारक नेत्यांना मात्र कधीच दररोज जगण्या-मरण्याची लढाई लढणाऱ्या सामान्यांची आठवण आली नाही, हे शेष.
जिल्ह्यात पुरात घर वाहून गेले म्हणून यांपैकी एकाही नेत्यांनी पीिडताचा इमला कधी उभा केला नाही. खरडून गेलेल्या पिकांना पुन्हा जोमाने उभे करण्यासाठी कुणीच जीवाचा आटापिटा केला नाही. प्रत्येक रस्त्यावर डोकी फोडून घेणारे खड्डे असताना रस्ता बांधणाऱ्या कंत्राटदाराला कुणी पकडले नाही. वर्षभर शेतमाल बेभाव बाजारात लुटला गेला, तेव्हा यांपैकी कुणीही ओरडला नाही. शाळेत शिक्षक नाही म्हणून कुणाचा कधी आवाज आला नाही. रुग्णालयात सोयी नाहीत म्हणून कुणीच संबंधितांना धारेवर धरले नाही. घोिषत झालेले टेक्सटाइल पार्क कुठे गायब झाले, याची विचारणा कुणी केली नाही. कालव्यातून पाणी जात असताना शेजारच्या शेताला ते का िमळत नाही, असा सवालही कुणी केला नाही. सध्या सोयाबीन, कपाशीचे पीक पाण्याअभावी सुकत आहे त्यामुळे वीज पुरवा, असे कुणीही सांगत नाही. शहरात येणारे उद्योग रस्त्यात कुठे अडकले उर्वरितपान
राजकारणातील मूल्य हरपल्यामुळे ही पडझड सुरू आहे. पक्ष कार्यकर्त्यांशी, निष्ठा मूल्यांशी फारकत घेणे नेतृत्वाने सुरू केले आहे. केवळ सत्ताकारणासाठीच पक्ष उभे झाल्यामुळे राजकारणाची आज अशी अवस्था झाली आहे. प्रा.सुभाष गवई, राज्यशास्त्र,विद्यापीठ अभ्यास मंडळाचे सदस्य. पूर्वी समाजकारणासाठी सत्ता हे साधन होते. परंतु आता सत्ता हेच साध्य झाले आहे. झटपट पदे प्राप्त करण्यासाठी सर्वच धावपळ करीत आहेत. समाजकारण बाजूला पडले आहे. सर्वच पक्षांनी नाड्या आपल्या हातात राहाव्या म्हणून कार्यकर्त्यांना मोठे केल्याने आज उमेदवारही आयात करण्याची पाळी पक्षांवर आली आहे. प्रा.अंबादास मोहिते, समाजशास्त्रतज्ज्ञ.