आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाट विकासाकरिता वन कायद्यात सुधारणा, नितीन गडकरींची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारणी- मेळघाटातीलआदिवासींच्या विकासात अडसर ठरणाऱ्या वन कायद्यात आवश्यक त्या सुधारणा आणि दुरुस्त्या करून विकासाचे मार्ग खुले केले जातील, अशी घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी धारणी येथे बुधवारी केली; तसेच अचलपूरपासून खंडवा बऱ्हाणपूरपर्यंतच्या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करण्याची ग्वाही गडकरी यांनी या वेळी दिली.
मेळघाट मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रभुदास भिलावेकर यांच्या प्रचारार्थ गडकरी मेळघाटातील धारणी येथे आले होते. या वेळी बोलताना गडकरी यांनी आदिवासींच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचे आश्वासन दिले. माजी मंत्री शोभा फडणवीस, मध्य प्रदेशातील नेपा नगरचे आमदार राजेंद्र दादू, प्रभुदास भिलावेकर, गजानन कोल्हे, सीमा कोल्हे, नारायण पटेल, रमेश राईकवार, सुधाकर फकडे, उमेश नवलाखे मंचावर उपस्थित होते. सध्या अस्तित्वात असलेल्या वन कायद्यामुळे आदिवासी जनतेची पारंपरिक जीवनपद्धतीच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सभा आटोपून गडकरी मेळघाटात आले होते. मेळघाट मतदारसंघात भाजपचे दहा वर्षे आमदार असलेले राजकुमार पटेल राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे आहेत, तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार केवलराम काळे ही निवडणूक लढवत आहेत. मेळघाट मतदारसंघात एकूण सहा उमेदवार उभे आहेत.
धारणी येथील प्रचार सभेत उपस्थित जनसमुदायाला भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबाेधित केले. मंचावर अनेक मान्यवर उपस्थित होते.

पृथ्वीराज चव्हाण कहाँ से पैदा हुआ?
नितीनगडकरी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. नागपूरनजीक विकासाचे महाद्वार असलेला मिहान प्रकल्प मुख्यमंत्र्यांच्या धोरणामुळे बंद पडला, असा आरोप त्यांनी केला. यह पृथ्वीराज चव्हाण कहाँ से पैदा हुआ, असा सवाल करीत गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांची चांगलीच खिल्ली उडवली.
रस्त्यांची डागडुजीसुद्धा नाही
युतीसरकारच्या काळात मेळघाटामध्ये रस्ते बांधण्यात आले होते. यामुळे जंगलातील खेडी बारमाही रस्त्याने जोडली गेली होती. मात्र, राज्यातील युती सरकारनंतर आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने मेळघाटातील रस्त्यांची साधी डागडुजीसुद्धा केली नाही, असा आरोप नितीन गडकरी यांनी केला.
राज्यसहाव्या क्रमांकावर
मागीलपंधरा वर्षांत आघाडी सरकारने राज्यावर तीन लाख कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. हे कर्ज आणि व्याज दोन्ही येणाऱ्या सरकारला फेडायच्या आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.विकासात पहिला असलेला महाराष्ट्र आघाडी सरकारने सहाव्या क्रमांकावर नेऊन ठेवल्याचा आरोप गडकरींना केला.