आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण 663 मतदान केंद्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मतदानाला केवळ तीन दिवस उरल्याने विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी बंदोबस्ताची परिपूर्ण तयारी केली आहे.
आयुक्तालयाच्या हद्दीत अमरावती, बडनेरासह तिवसा धामणगाव रेल्वे मतदार संघातील काही गावांचा समावेश असल्याने मतदान केंद्रांची संख्या 663 वर पोहोचली आहे. एकूण 265 इमारतींमध्ये असलेल्या या मतदान केंद्रांपैकी अमरावती मतदार संघातील केवळ तीन केंद्र संवेदनशिल आहेत. याशिवाय 40 महत्वाच्या केंद्रांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. या मतदान केंद्राव्यतिरीक्त अन्य काही महत्वाच्या मतदान केंद्रावर शहर पोलिसांच्या मदतीसाठी आलेल्या केंद्रीय पोलिस दलाचे जवान कार्यरत राहणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर तगडा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मतदारसंघासाठी ग्रुप अधिकारी नियुक्‍ती
प्रत्येकमतदार संघाला एसीपी दर्जाचे स्वतंत्र अधिकारी ‘गृप ऑफीसर’ म्हणून नेमले आहेत. अमरावतीसाठी एसीपी लतीफ तडवी, तिवसाकरिता अशोक कळमकर आणि बडनेरा, धामणगावसाठी जी. एम. साखरकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक ठाण्यात ते गस्त पथक राहणार असून, याशिवाय सात ‘स्ट्रायकिंग फोर्स’ सुरक्षेसाठी कार्यरत राहणार असल्याची माहिती आयुक्तालयातील विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली आहे.