आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानातील कामगारांनाही मतदानासाठी पगारी सुटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दुकान,हॉटेल्स, मॉल्स आदी ठिकाणी कार्यरत कामगारांना मतदानासाठी पगारी सुटी देण्याचे आदेश राज्य सरकारने जारी केले आहेत. 15 ऑक्टोबर रोजी राज्यभरातील कामगारांसाठी ही पगारी सुटी लागू असेल.
कामगारांना मतदान करण्यापासून कोणत्याही व्यक्तीला, संस्थेला अगर प्रतिष्ठानाच्या मालकाला रोखता येणार नाही अथवा सुटीही नाकारता येणार नाही. मतदान करण्यासाठी कामगारांना दिली जाणारी सुटी ही देखील पगारी असेल. या सुटीसाठी पगारातून कोणतीही रक्कम कपात करू नये, असे आदेशही उद्योग, उर्जा कामगार विभागाने काढले आहेत. त्यामुळे चहाच्या दुकानावर काम करणाऱ्या व्यक्तीपासून कार्पोरेट कंपनीत कोट-टाय घालून वावरणाऱ्या एक्झीक्युटिव्ह पर्यंत प्रत्येकालाच 15 ऑक्टोबरच्या दिवशी मतदानासाठी पूर्ण दिवस अथवा अर्धा दिवस सुटी मागण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त होणार आहे. मतदानापासून कोणत्याही कामगाराला कोणीही वंचित ठेवत असेल, तर अशा मालक, प्रतिष्ठान अथवा संस्थेविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. ज्या कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये अथवा उद्योगांमध्ये २४ तास काम सुरू असते, अशा ठिकाणी कामगारांना किमान दोन तासांची सुटी मतदानासाठी देणेही बंधनकारक असणार आहे. या आदेशाचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मतदानापासून रोखता येणार नाही,सुटीही नाकारता येणार नाही