आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल पेन्शन योजनेला अल्प प्रतिसाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेला वयाच्या अटीमुळे अमरावती जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. १८ ते ४० या वयोगटांतील पुरुष महिलांनाच या योजनेचे लाभार्थी होता येत असल्यामुळे अन् वाढत्या वयासोबत दरमहा हप्ताही जास्त भरावा लागत असल्याने अद्याप अनेकांच्या मनात ही योजना घर करू शकली नाही.
पंतप्रधान जीवन सुरक्षा जीवनज्योती या योजनांना संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.
त्या तुलनेत अटल पेन्शन याेजनेला अल्प प्रतिसाद अाहे. म्हणूनच केंद्राच्या निर्देशानुसार आम्ही जनसहभाग वाढवण्यासाठी येत्या काही दिवसांत संपूर्ण जिल्ह्यातच बैठका घेणार आहोत, माहिती सेंट्रल बँकेचे अग्रणी जिल्हा व्यवस्थापक ए. बी. खोरगडे यांनी दिली, अशीच प्रतिक्रिया स्टेट बँक आॅफ इंडियाच्या मुख्य शाखेचे व्यवस्थापक बसू यांनीही व्यक्त केली आहे.
कमीत कमी गुंतवणूक करून म्हातारपणातील सुखी आयुष्याची सोय व्हावी, हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
प्रत्येक व्यक्तीला वयाच्या ६० वर्षांनंतर किती रुपये दरमहा पेन्शन हवी त्यानुसार दरमहा हप्ता भरावा लागेल. ही रक्कम त्याच्या बँक खात्यातून वळती (आॅटो डेबिट) केली जाईल. ग्राहकाचे ज्या बँकेत खाते असेल, त्या बँकेतच त्याला अटल पेन्शन योजनेचा अर्ज करावा लागेल. कोणत्याही व्यक्तीचे केवळ एक बचत खाते या योजनेसाठी ग्राह्य धरले जाईल. जर एखाद्या व्यक्तीचे दहा बँकांमध्ये खाते असेल, तर तो केवळ एकट्याच्या नावावर दहा ठिकाणी रुपये गुंतवू शकणार नाही. पती पत्नी दोघांनाही या योजनेचा फायदा घेता येईल.

पाच हजारांपर्यंत पेन्शन
उदाहरणादाखल तक्ता
६० वर्षांनंतर दरमहा एक ते पाच हजार रुपये पेन्शन मिळेल. यासाठी योजना सुरू करतानाच त्याला दरमहा किती पेन्शन हवी ते निश्चित करावे लागेल. त्यानुसार त्याला दरमहा हप्ते भरावे लागतील. वाढत्या वयानुसार हप्त्यांची रक्कमही वाढत जाणार आहे. सर्वाधिक हप्ता हा १४५४ रु. भरावा लागतो. वयाच्या ४० व्या वर्षी योजनेचा लाभ घेणाऱ्याला एवढी रक्कम भरावी लागेल.
वय हप्त्यांचे हप्ता ६० नंतर वारसाची वर्ष पेन्शन रक्कम
१८४२ २१० ५,००० ८.५ लाख
२० ४० २४८ ५,००० ८.५ लाख
२५ ३५ ३७६ ५,००० ८.५ लाख
३० ३० ६७७ ५,००० ८.५ लाख
३५ २५ ९०२ ५,००० ८.५ लाख
४० २० १४५४ ५,००० ८.५ लाख
जिल्ह्यात जागोजागी घेणार बैठक
जिल्ह्यातअटल पेन्शन योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. लोकप्रियतेसाठी केंद्राच्या निर्देशानुसार गाव, तालुका, शहरांसह संपूर्ण जिल्ह्यात बैठका घेऊन लोकसहभाग वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ए.बी. खोरगडे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक, सेंट्रल बँक.