आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Author Mukunda Taksaale,Latest News In Divya Marathi

खरा विनोदी लेखक कुणालाच देव मानत नाही- मुकूंद टाकसाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- खरा विनोदी लेखक हा कुणालाच देव मानत नाही. प्रत्यक्ष देव जरी त्याच्यासमोर आला, तरी तो त्याला मानणार नाही. व्यक्तिपूजेने विनोद निर्माण होत नाही, तर प्रसंगावधानाने विनोदाची निर्मिती होते, असे प्रतिपादन पुणे येथील विचारवंत मुकूंद टाकसाळे यांनी मंगळवारी केले.

अमरावती नगर वाचनालायाच्या वतीने गो. ग. राठी सभागृहात लोकमान्य टिळक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. चवथे पुष्प गुंफताना चिं. वि. जोशी यांच्या विभिन्न विनोदाची कथा त्यांनी सभागृहातील उपस्थित र्शोत्यांमुढे मांडली. जोशी यांच्या विनोदाचे किस्से ऐकतांना र्शोतृवर्गाची चांगलीच दाद मिळाली. विनोद हा मोकळ्या वातावरणात अधिक खुलतो. यासाठी त्यांनी, ‘असे पाहिजे होते, लहान मुलांसाठी ओसाडवाडांचे देव, दैव देतो अन् , अनुसयेचे अनुपाठ’, अशा विविध चिमणरावांच्या कथा ऐकवल्या. दरम्यान, ओसाडवाडांचे देव व अनुसयेचे अनुपाठ कथेचे किस्से ऐकतांना उपस्थित लोटपोट झाले. विनोदी कथेचे किस्से ऐकतांना र्शोत्यांनी त्याचा मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेश भावे उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून नगर वाचनालयाचे अध्यक्ष दिगांबर महाजन, ग्रंथपाल उद्धव परांजपे व डॉ. पाटील उपस्थित होते. यावेळी संपूर्ण सभागृह भरगच्च भरले होते.