आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बसपेक्षा ऑटोच महाग; अवाच्या सव्वा दराने वसूल होतेय भाडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहर बसची चाके ज्या भागांमध्ये पोहोचू शकलेली नाहीत, अशा भागातून ऑटोने करावा लागणारा प्रवास अमरावतीकरांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, शहर बस वाहतुकीचे तिकीट दर निश्चित करण्यासाठी यंत्रणा आहे; परंतु ऑटोतून प्रवास करायचा असल्यास किमान दर किती असावे, हे ठरवणारी प्राधिकारिणीच अमरावतीत नसल्यामुळे ऑटोतून प्रवास करण्यासाठी अवाच्या सव्वा रक्कम अमरावतीकरांना मोजावी लागत आहे.

कोणत्याही ऑटो संघटनेला वा ऑटोचालकांना विरोधाचा हा भाग नाही. परंतु हा थेट नागरिकांच्या हिताचा मुद्दा असल्याने अनेक दिवसांपासून ऑटोंना मीटर बसवले जावे, अथवा त्यांच्या भाड्याचे किमान दर निश्चित व्हावे, यासाठी ‘दिव्य मराठी’ पाठपुरावा करत आहे.

बसपेक्षा अधिक दर : राज्यपरिवहन महामंडळाच्या बसने अमरावतीहून अकोल्याला प्रवास करायचा असल्यास तिकीट दर १०५ रुपये आहे. परंतु, अमरावतीतल्या अमरावतीत ऑटोने प्रवास करायचा झाल्यास १०० ते १५० रुपये मोजावे लागतात. बडनेराहून शहरात येण्यासाठी शेअरिंग ऑटोत २० रुपये मोजावे लागतात. शहर बसचे हेच दर आहेत.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : महापालिकेचे शहर असल्यामुळे येथे मीटरने ऑटो असणे अभिप्रेत आहे. परंतु, मनमानी भाडे वसुलीमुळे अमरावतीकरांना अतिरिक्त भुर्दंड पडतोय, याकडे लक्ष देऊन ऑटोचे किमान भाडे निर्धारण करून घेणे आमदारांसारख्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित आहे.
मीटर लागले आहेत; दरही निश्चित
प्रत्येकऑटोला मीटर लावणे बंधनकारक आहे. किलोमीटर प्रमाणे दर ठरवून दिलेत. त्यामुळे ऑटो चालकांनी मीटरनुसारच पैसे घेणे बंधनकारक आहे. तसे होत नसेल तर आमच्याकडे लेखी तक्रार करा. श्रीपादवाडेकर, प्रादेशिकपरिवहन अधिकारी.
लहान शहरात मीटर चालत नाहीत
लोक मीटरने पैसे द्यायला तयार नाहीत. त्यामुळे मीटर बंद करून ठेवले. नागपूर, पुणे, मुंबई येथेही अनेक जण शेअरिंग ऑटोच घेतात. पेट्रोलच्या दरामुळेही जाणे येणे परवडत नाही. शेअरिंगचे दर ठरलेले आहेत. शेखअन्वर, ऑटोचालक.

अमरावती- अकोला १०५ रुपये
अमरावती- मूर्तिजापूर ६२ रुपये
अमरावती- नागपूर १६३ रुपये
नया अमरावती- दस्तुरनगर १८० ते २०० रुपये
बस स्थानक- दस्तुरनगर ६० ते ८० रुपये
बस स्थानक- विद्यापीठ ७० ते ८० रुपये
बडनेरा- राजकमल (शेअरिंग) : २० रुपये
बडनेरा- अमरावती (स्पेशल) ६० ते ७० रुपये
राजकमल- गाडगेनगर (शेअरिंग) : २० रुपये
राजकमल- गाडगेनगर (स्पेशल) : ६० ते ७० रुपये
बडनेरा ते नवसारी (स्पेशल) : १५० रुपये
बडनेरा-विद्यापीठ : १८ रुपये
बडनेरा-नवसारी : १६ रुपये
बडनेरा- बस स्थानक : १३ रुपये
बडनेरा-राजकमल : १२ रुपये
बडनेरा- साईनगर : १० रुपये
बडनेरा- राजापेठ: १२ रुपये
बडनेरा- गाडगेनगर : १४ रुपये
बडनेरा- इर्विन : १३ रुपये