आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांनाे, अत्याचाराविरोधात लढा ! छायािचत्रांतून मांडली व्यथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -स्त्रियांनासमाजात सन्मान मिळावा, यासाठी घरातूनच मुलांवर याेग्य संस्कार व्हायला हवेत. सामाजिक बदल घडवून आणण्याची शक्ती महिलांमध्ये अाहे. मात्र, आज महिला अन्यायाला बळी पडत आहेत. त्यामुळे महिलांनी मागे राहता अत्याचाराविरोधात संघटित होऊन लढादिला पाहिजे, असा सूर महिला हिंसा जागृती मेळाव्यामधून उमटला. बहुजन हिताय सोसायटी, अमरावतीतर्फे टाउन हॉलमध्ये नुकताच हा मेळावा घेण्यात आला. ‘महिलांनाे, परिवर्तनासाठी पुढे या’ असे आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून मान्यवरांनी केले आहे.
शहरातील बहुजन हिताय साेसायटीतर्फे दलित आदिवासी, भटके विमुक्त जाती-जमाती, अल्पसंख्याक महिला हिंसाविरोधी अभियान २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबवण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत २५ नोव्हेंबरपासून विविध जनजागृतीपर कार्यक्रम साेसायटीने राबवले. महिला हिंसाचाराविरोधात स्त्रियांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी सोसायटीच्या वतीने टाउन हॉलमध्ये मेळावा घेण्यात आला. धम्मचारिणी अचलामनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर जर्मनी येथील सोलेरा कंपनीच्या व्यवस्थापक ओलगा वुल्फ, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. दिलीप काळे, तक्षशिला महाविद्यालयाच्या डॉ. पूनम अभ्यंकर, ओलावा संस्थेच्या मीरा कडबे आदींची या वेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. माध्यमांमधून दररोज हृदय हेलावून टाकणाऱ्या महिला हिंसाचाराच्या घटना ऐकायला मिळतात. अत्याचाराचे आकडे धक्कादायक आहेत. वाढते अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेता आपण संस्कारांमध्ये कमी पडतोय की काय, असा प्रश्न उपस्थित करत डॉ. अभ्यंकर यांनी संस्कारांचे महत्त्व सांगितले. दारूमुळे महिला हिंसाचार वाढले आहेत. राज्यभरात दारूबंदीसाठी महिला पुढाकार घेऊन आंदोलने करताहेत.
दारूची दुकाने बंद करण्याचा सपाटाच महिलांनी लावला अाहे. यावरून महिलांमधील शक्ती लक्षात येते. त्यंानी अत्याचाराविरोधात पेटून उठल्यास निश्चितच सामाजिक परिवर्तन होईल, असे मत डॉ. काळे यांनी मांडले. इतर मान्यवरांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

मेळाव्यातून केले प्रबाेधन
शहरीग्रामीण भागातील स्त्री-पुरुषांमध्ये महिला हिंसाचाराविरोधात जनजागृती निर्माण व्हावी, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवण्यासाठी योग्य माहिती प्राप्त व्हावी. विविध कायदे नियमांचे महिलांना ज्ञान व्हावे, या साठी महिला हिंसा जागृती मेळावा घेण्यात आला.
पोस्टर प्रदर्शनातून जनजागरण
बहुजनहिताय सोसायटीच्या वतीने महिला हिंसा जागृती मेळाव्यादरम्यान टाउन हॉलच्या व्हरांड्यात पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते. स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, मुलींना जन्म द्या, महिला हिंसाचार रोखा असे विविध संदेश पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
अभियानातून जनजागृतीपर विविध कार्यक्रमांची रेलचेल
महिलाहिंसा विरोधी अभियानात सोळा दिवसांच्या कालावधीत बहुजन हिताय सोसायटीच्या वतीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले आहेत. कौटुंिबक हिंसाचार, लिंगभेदावर आधारित हिंसाचार अशा विषयांवरील मार्गदर्शन कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम, किशोरींकरिता कार्यशाळा, पोस्टर स्पर्धा असे विविध कार्यक्रम या अभियानातून घेण्यात आले आहेत.