आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बी.एड.’ चा रद्द पेपर आता मे महिन्यात होणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बी.एड.परीक्षेतील रद्द झालेला पेपर आता शनिवारी मे रोजी घेतला जाणार आहे. बी.एड.चा ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ हा पहिला पेपर सोमवार २० एप्रिलला नियोजित होता. मात्र, िनयोजित पेपरएेवजी शैक्षणिक मानसशास्त्राची प्रश्नपत्रिका दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा पेपर सोडवण्यास नकार दिल्याने विभागातील ३२ परीक्षा केंद्रांवर गाेंधळ उडाला होता. शेवटी िवद्यापीठाने बी.एड्.चा पहिला पेपर रद्द केला होता.

विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून पूर्वीच्याच परीक्षा केंद्र तसेच पूर्वीच्याच वेळेवर या विषयाचा पेपर आता मे रोजी होणार अाहे,असे स्पष्ट केले आहे. बी.एड. परीक्षेत गाेंधळ उडाल्याने परीक्षा मंडळानेदेखील बैठक बोलावत तज्ज्ञांकडून चौकशीचे संकेत दिले होते. मॉडरेशन समितीकडून चूक झाल्याने त्याचा मोठा फटका साडेपाच हजार विद्यार्थ्यांना बसला होता. साडेपाच हजार प्रश्नपत्रिका नव्याने छपाईची वेळदेखील विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आली. विद्यापीठ अंतर्गत ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाच्या पेपरने बी.एड. अभ्यासक्रमाच्या परीक्षा २० एप्रिलपासून सुरू होणार होत्या. सकाळी नऊ वाजता अमरावती विभागातील एकूण ३२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. नियोजित वेळापत्रकानुसार सर्व विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर पोहोचलेदेखील. मात्र, त्यांना दुसऱ्याच विषयाची प्रश्नपत्रिका दिली. कोड क्रमांक १५८१ ‘उदयोन्मुख भारतीय समाजातील शिक्षक’ या विषयाऐवजी २३ एप्रिल रोजी नियोजित असलेल्या ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ या विषयाची प्रश्नपत्रिका दिली होती. तयारी करून आलेल्या विषयाऐवजी दोन दिवसांनंतर होऊ घातलेल्या ‘शैक्षणिक मानसशास्त्र’ विषयाची प्रश्नपत्रिका पाहून विद्यार्थी चक्रावले. विद्यार्थ्यांकडून नियोजित विषयाच्या प्रश्नपत्रिकेची मागणी केली. मात्र, विद्यापीठाच्या सर्वच केंद्रांवर सारखीच प्रश्नपत्रिका पाठवली होती. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक मानसशास्त्र विषयाचा पेपर सोडवण्यास नकार िदला होता. नियोजित विषयाची प्रश्नपत्रिका सर्व परीक्षा केंद्रांवर पाठवणे शक्य नसल्याने विद्यापीठाने हा पेपर रद्द केला होता.