आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडनेराचे विकासाचे स्वप्न फुलणार! विकासासाठी महापािलकेने केले ‘मायक्रो प्लॅनिंग’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बडनेराशहराच्या विकासासाठी महापािलकेेने‘मायक्रो प्लॅिनंग’ केले आहे. याबाबत नगरसेवकांकडून आलेल्या सूचनांचा नियोजनात समावेश करण्यास महापािलका आयुक्त अरुण डोंगरे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. पहिल्यांदा अनिवार्य समस्यांच्या निराकरणास प्राथमिकता देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
स्वतंत्र नगरपािलका असलेल्या बडनेराचा अमरावती महापािलकेत समावेश करण्यात आला. मात्र, त्यानंतर बडनेराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची ओरड नगरसेवकांकडून होत आहे. उद्योगांचे स्वप्न दाखवले. मात्र, राजकीय स्वार्थापायी तेदेखील रखडले. प्राथमिक सुविधांचा अभाव येथील मुख्य समस्या असून, विविध भागांमध्ये ती नेमकी आढळून येते. महापािलकेत असूनही येथे पायाभूत प्राथमिक सुविधांची वानवा आहे, हेच येथील नागरिकांचे दुर्भाग्य असल्याचे शहरविकास तज्ज्ञांचे मत आहे.
महापालिकेच्या ऑगस्ट महिन्यातील सर्वसाधारण सभेमध्ये युवा स्वाभिमानचे नगरसेवक प्रा. विजय नागपुरे यांनी बडनेरा शहराच्या विकासाकडे लक्ष दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला, तर सभागृहाच्या वरिष्ठ सदस्य तसेच वर्तमान शहर सुधार समिती सभापती डॉ. कांचन ग्रेसपुंजे यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली. सभागृहात सदस्यांच्या भावनांची दखल घेत आयुक्त अरुण डोंगरे यांनी याबाबत बडनेरा येथेच बैठक आयोजित केली होती.

सदस्यांकडून आलेल्या सूचना अग्रक्रमाने सोडवण्याबाबत आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली. याबाबत सहायक आयुक्त योगेश पीठे यांना नियोजनबद्ध अहवाल तयार करण्याचे देखील आयुक्तांनी निर्देश दिले. ते लवकरच अहवाल सादर करणार आहेत. बैठकीला उपायुक्त विनायक औगड, जनकल्याण-जनविकास-रिपाइं फ्रंटचे गटनेते प्रकाश बनसोड, काँग्रेसच्या डॉ. कांचन ग्रेसपुंजे, जावेद मेनन, प्रा. विजय नागपुरे, जयश्री मोरे, चंदूमल िबल्दानी, गुंफा मेश्राम यांची उपस्थिती होती.

ऑनलाइन प्रणालीचे उद्घाटन
जन्म-मृत्यूप्रमाणपत्र पूर्वी बडनेरा झोन कार्यालयातून दिले जात होते. दोन ते तीन महिन्यांपूर्वी ते बंद करण्यात आले. त्यामुळे बडनेरा झोनमधील नागरिकांना अमरावती येथील मुख्य प्रशासकीय कार्यालयातून प्रमाणपत्र घ्यावे लागत होते. बैठक आटोपल्यानंतर आयुक्त अरुण डोंगरे यांनी बडनेरा कार्यालयातून जन्म मृत्यू प्रमाणपत्र देता यावे, म्हणून ऑनलाइन प्रणालीचा शुभारंभ केला. आगामी आठ दिवसांत त्याद्वारे दाखले मिळणार आहेत.
* बडनेरा रेल्वे स्थानकावर जुनी वस्ती भागात नव्याने आरंभ करण्यात आलेल्या तिकीटघर येथून शहर बससेवा आरंभ करणे, याबाबत रेल्वे विभागाच्या डीआरएम कार्यालयासोबत पत्र व्यवहार करणे.
* जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळावे म्हणून ऑनलाइन प्रणाली आरंभ करणे.
* बडनेरा शहराच्या दिशेने असलेल्या एक्स्प्रेस हायवे प्रवेशद्वाराचा विकास सौंदर्यीकरण करणे.
* अमरावती-बडनेरा असे महापालिकेचे नामकरण करणे, शासनास ठराव पाठवणे.
* सोमवार बाजार परिसरात बीओटी तत्त्वावर व्यापारी संकुलाची निर्मिती करणे.
* रजानगरातील उर्दू शाळेसाठी शासकीय जागा अधिग्रहित करणे.
* शहीद स्मारकाजवळील खुली जागा अधिग्रहित करून तेथे उद्यान विकसित करणे.
* शहर बस स्थानकासाठी आरक्षित असलेल्या चमननगरातील जागेवर स्टार बस डेपो निर्माण. व्यापारी संकुलाची निर्मिती.
नियोजनात समाविष्ट मुद्दे
*यवतमाळ टी-पाँइंट येथे अग्निशमन विभागाचे एक बंब सदैव राहावे म्हणून जागा अधिग्रहण करणार
* पाणी पुरवठ्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त सकारात्मक
* झोन कार्यालय असलेल्या जयहिंद मैदान येथे सांस्कृतिक भवनाची निर्मिती करणे
* जयहिंद मैदानात रेल्वेकडे जाणाऱ्या मार्गावर व्यापारी गाळ्यांचे बांधकाम करणे
* नवी वस्ती मुस्लिम कब्रस्तान येथे सुरक्षा भिंतीचे बांधकाम करणे
* जुनी वस्ती येथील सावित्रीबाई फुले सूतिकागृह सामाजिक संस्थेला चालवण्याकरिता देणे