आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पशा शेतीतून घेतले साडेपाच लाख रुपयांचे केळी उत्पादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- शासकीय योजनांचा फायदा आणि नवतंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेतीतून सोनं कसं पिकवता येते हे अचलपूर तहसिल अंतर्गत येणाऱ्या रासेगांव येथील बाबूराव खांडोकर या शेतकऱ्यांने दाखवून दिले आहे.
त्‍यांनी सुमारे दोन एकर शेतीत केळीच्या पिकातून तब्बल लाख ८५ हजाराचे उत्पन्न घेतले. तुषार संचाच्या माध्यमातून पहिलाच प्रयोग म्हणून त्यांनी टिशुकल्चर केळीचे वान असलेल्या २२०० रोपांची लागवड केली. बाबुराव खांडोकार यांनी आपल्याकडे असलेल्या दोन एकर कोरडवाहू शेतीला बोअरवेल विहीर करून ओलीताची सोय केली. पुढे तुषार संचाच्या माध्यमातून पहिलाच प्रयोग म्हणून केळीच्या २२०० रोपांची लागवड केली. पुढे या केळीच्या प्रत्येक झाडाला ६० ते ६५ किलो वजनाचा घड लागला. एका झाडाला ७४ किलो वजनाचा घड आढळून आला. या शेतातून त्यांनी लाख ८५ हजाराचे उत्पादन घेतले. त्यामधून लाख ३४ हजारांचा खर्च वजा करता लाख ५१ हजाराचे उत्पन्न त्यांना झाले. यासाठी अचलपूर तालुक्यातील कृषी अधिकारी एस. बी. जाधव, रासेगांव येथील कृषीसहाय्यक एस. यू. पाटील यांचे त्यांना विशेष मार्गदर्शन लाभले.

नावीन्यपूर्ण प्रयोग आवश्यक
कृषीविभागाची तांत्रिक माहिती माझ्या प्रयोगशील उत्सुकतेतून मी हे उत्पादन घेऊ शकलो आहे. परंपरागत शेती सोबतच नाविण्यपूर्ण प्रयोग आवश्यक आहेत. बाबुरावखांडोकर, प्रयोगशील शेतकरी
...हाच कृषी विभागाचा उद्देश
खांडोलकरयांनी मेहनत घेऊन भरघोस उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांना नाविण्यपूर्ण शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा कृषी विभागाचा उद्देश आहे. एस.यु. पाटील. कृषी सहायक रासेगांव
शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्‍न
कृषीविभागाच्या वतीने शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी नेहमी आमचा प्रयत्न असतो. अनेक शेतकरी आधुनिक शेतीसाठी उत्सुक असतात त्यांना माहिती देण्याचे कार्य आमचे आहे. एस.बी. जाधव, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, अचलपूर.