आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळी मदत मिळण्यासाठी बँकेत खाते असणे आवश्यकच !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यसरकारने दुष्काळग्रस्त शेतक-यांकरिता घोषित केलेल्या मदतीच्या रकमेचे धनादेश शेतक-यांच्या बँक खात्यातच जमा करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्या शेतक-यांचे अद्यापही बँक खाते नाही, अशा शेतक-यांनी तत्काळ कोणत्याही राष्ट्रीयीकृत अथवा सहकारी बँकेत बचत खाते उघडावे, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. केंद्र सरकारने नव्यानेच सुरू केलेल्या जन-धन योजनेअंतर्गतही शेतक-यांना बचत खाते उघडता येईल. या संदर्भात विभागीय महसूल उपायुक्त रवींद्र ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, की मदतीचे धनादेश शेतक-यांच्या बँक खात्यातच जमा करण्यात येत आहे. ज्या शेतक-यांचे बँक खाते नाही, अशा शेतक-यांचा शोध घेऊन त्यांना बँक खाते उघडण्याकरिता सांगण्यात आले आहे. खाते उघडल्यानंतर तलाठी अथवा तहसीलदाराकडे बँकेचा खाते क्रमांक कळवावा.