आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका पुन्हा एकदा संपाच्या उंबरठ्यावर, २३ फेब्रुवारीच्या चर्चेनंतर ठरणार आंदोलनाची दिशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डिसेंबर महिन्यात दोन दिवसांचा बंद पाळणाऱ्या बँका पुन्हा एकदा संपाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, २३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चर्चेतून हा बंद होणार किंवा नाही, हे निश्चित होणार आहे. ही चर्चा अयशस्वी ठरली, तर २५ फेब्रुवारीला अमरावतीकरांसह समस्त नागरिकांवर आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ ओढवली जाणाची भीती व्यक्त केली जात आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियनमध्ये (यूएफबीयू) समाविष्ट असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तब्बल २७ संघटनांनी या संपाची हाक दिली आहे. अमरावती जिल्ह्यात सर्व सत्तावीसही बँकांच्या अडीचशेवर शाखा आहेत. त्याद्वारे दरदिवशी आठशे कोटींची उलाढाल होते. एकट्या अमरावती शहरात तीनशे कोटींचे व्यवहार होतात, असा अंदाज आहे. संप झाल्यास याचा मोठा फटका बसेल.
सोमवारी पुन्हा चर्चा

बँकांचा संप मिटावा, यासाठी इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) ही शासकीय यंत्रणा यूएफबीयू यांच्यादरम्यान चर्चा सुरूच आहे. सोमवारीही ही चर्चा सुरूच राहील. दरम्यान, सायंकाळपर्यंत समझोता झाल्यास अमरावती जिल्ह्यातील अडीचशेवर शाखांमध्ये कार्यरत एक हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांनी संपात सहभागी व्हायचे ठरवले आहे.

या आहेत मागण्या?

‘यूएफबीयू’ने पुकारलेल्या या संपाची मुख्य मागणी वेतन पुनर्रचना करार आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये हा करार व्हायला हवा होता. परंतु, तो अद्यापही झाला नाही. त्यामुळे युनियनने प्रारंभी २५ टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. ती आता १९ पर्यंत घसरली आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने साडेबारा टक्के वाढीची तयारी दर्शवली आहे. आता चर्चेनंतरच यावर निर्णय होईल.

लिपिका पेक्षाही कमी वेतन

^बँकेत कार्यरत अधिकाऱ्यांना केंद्राच्या लिपिकापेक्षाही कमी वेतन मिळते. सहाव्या वेतन आयोगानुसार केंद्रात कार्यरत लिपिकाला दरमहा ३४ हजार ९८८ रुपये वेतन (ग्रॉस सॅलरी) मिळते. याऊलट बँकेच्या अधिकाऱ्याचे वेतन ३२ हजार ६७० रुपये आहे. लिपिकाला तर १५ हजार १६५ रुपयेच वेतन दिले जाते. सुनीलटेंभुर्णे, पदाधिकारी,एआयईबीए, अमरावती.