आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bappa Maza Sarwat Changla Prize Distribution In Amaravati Divyamarathi

‘बाप्पा माझा सर्वांत चांगला’ विजेत्यांचा आज गौरव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- ‘दिव्य मराठी’ व घरकुल मसाले यांच्यातर्फे गणेशोत्सवादरम्यान राबविण्यात आलेल्या ‘बाप्पा माझा सर्वांत चांगला’ या उपक्रमातील विजेत्यांना शनिवारी (दि.21) दुपारी चार वाजता दिव्य मराठी कार्यालयात गौरवण्यात येणार आहे.

नऊ ते 18 सप्टेंबर या कालावधीत राबवलेल्या या उपक्रमात शहरातील तब्बल दीड हजार नागरिकांनी सहभाग घेतला. त्यांपैकी अभिजित देशमुख, रवींद्र चिखलकर, अशोक नाचाडे, चंद्रशेखर तवलारे, प्रसन्न केलजेवार, मनोज तिवारी, साकेत जोशी, यश पुरी, आश्विनी कोकाटे आणि योगिता शर्मा या दहा विजेत्यांची बक्षिसासाठी निवड झाली आहे. दै. ‘दिव्य मराठी’ कार्यालयात घरकुल मसालेचे संचालक तुषार वरणगावकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात येणार आहे. विजेत्यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.