आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बर्ड फ्लू'बाबत सतर्कतेचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - तेलंगणात या आजाराची लागण झाल्यामुळे १.६० लाख कोंबड्या दोन लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत. या आजाराचे गांभीर्य ओळखून आरोग्य संचालनालयाने आरोग्य यंत्रणेला दक्षतेचा इशारादिला आहे.

हैदराबाद आणि राज्यातील काही जिल्ह्यांत बर्ड फ्लूची लागण झाली आहे. हा भाग महाराष्ट्राच्या सीमेवर असल्याने आजार राज्यात पसरण्याची शक्यता गृहीत धरून हा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र बुधवारी (दि. २९) अमरावतीतील आरोग्य यंत्रणेच्या अधिका-यांना प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात कुठेही अचानक पक्षी कोंबड्या मृतावस्थेत आढळल्याची घटना लक्षात आल्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या मदतीने सखोल शहनिशा करण्याचे निर्देश आरोग्य संचालनालयाने दिल्याचे पत्रात नमूद करण्यात अाले अाहे.
बातम्या आणखी आहेत...