आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Beating ST Driver, Drinking Two Wheeler Riders Behave

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एसटी चालकाला केली बेदम मारहाण, मद्यधुंद दुचाकीस्वारांचे कृत्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मद्यपीदुचाकीस्वार स्वत:च अनियंत्रित झाल्यामुळे त्यांची दुचाकी दुस-या दुचाकीला धडकल्याने एकजण जखमी झाला. मात्र, त्यांनी स्वत:च्या चुकीकडे दर्लक्ष करून एसटीचालकामुळेच हे घडले असे समजून मागून येणा-या एसटीचालकाला बसमधून खाली उतरवून बेदम मारहाण केली. हा विचित्र घटनाक्रम सोमवारी(दि.२) सायंकाळी वलगाव मार्गावर घडला.
राजेन्द्र रामदास टेमधरे (३७ रा. अकोला) असे मारहाणीत जखमी झालेल्या एसटीचालकाचे नाव आहे. राजेन्द्र टेमधरे हे परतवाडा आगाराला चालक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सांयकाळी ते एसटीबस घेऊन अमरावतीवरून परतवाड्याला जात होते. वलगाव बायपास मार्गाने जात असताना राजूपत हॉटेलनजीक एका दुचाकीस्वाराने राजेन्द्र टेमधरे यांची बस थांबवली. त्यांना जबरीने खाली उतरवून बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचे डोके फुटले. या घटनाक्रमाची माहिती होताच गाडगेनगर पोलिस घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी या मद्यपी दोन दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले. तसेच जखमी एसटी चालकाला उपचारासाठी इर्विनमध्ये आणले. या प्रकरणी एसटीचालकाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री दोन्ही मद्यपी युवकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, मारहाण या कलमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती गाडगेनगर पोलिसांनी दिली.