आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beginning Of SSC Exam,,latest News In Divya Marathi

मराठी’ने परीक्षेचा र्शीगणेशा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मातृभाषा मराठीच्या पेपरने सोमवारपासून दहावीच्या परीक्षांचा र्शीगणेशा झाला. पहिल्या दिवशी विभागीय परीक्षा मंडळाच्या भरारी पथकांनी जिल्हाभरात छापे घालून 18 विद्यार्थ्यांना गैरप्रकार करताना पकडले.
अमरावती जिल्ह्यातील मालखेडरेल्वे येथे परीक्षेदरम्यान गैरप्रकार करणार्‍या नऊ विद्यार्थ्यांना भरारी पथकाने पकडले. या सर्व विद्यार्थ्यांना पुढील चौकशीसाठी विभागीय परीक्षा मंडळाच्या अमरावती मुख्यालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. उर्वरित नऊ प्रकरणे जिल्ह्यात वेगवेगळ्या केंद्रांवर उघडकीस आल्याचे सांगण्यात आले. पहिलाच पेपर असल्याने जिल्ह्यातील 182 परीक्षा केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी बजावले होते.
जिल्हाभरातून सुमारे 42 हजार विद्यार्थ्यांनी मराठीचा पेपर दिल्याची प्राथमिक माहिती विभागीय परीक्षा मंडळाकडून मिळाली. दरम्यान, परीक्षेला जात असलेल्या विद्यार्थ्यांची विनाकारण अडवणूक करू नका, असे आदेश जिल्ह्यात पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यामुळे शहर आणि ग्रामीण वाहतूक शाखेतर्फे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची वाहने अडवण्याचे प्रमाण सोमवारी काहीसे घटल्याचे दिसून आले.