आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेंबळा पुनर्वसनाचा उडाला बोजवारा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभूळगाव - शहराला मुबलक पाणी व सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी तालुक्यातील बेंबळा नदीवर महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प उभारण्यात आला. मात्र, या प्रकल्पासाठी ज्यांनी घरदारांसह शेतजमीनी दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनस्थळी अजूनही आवश्यक नागरी सुविधा पोहोचल्या नसल्याने प्रकल्पग्रस्तांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून कोणतेच प्रयत्न होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रकल्पात तालुक्यातील पहुर, डेहणी, मालापूर, दिघी, भटमार्ग, कोल्ही, बारड, कोठा फत्तेपूर, खडकसावंगा, पिंपळखुटा, नागरगाव आदी गावातील लोकांनी समृद्ध तालुक्यासाठी सुपीक जमीन, राहते घर देवून त्याग केला. त्या सर्व गावातील नागरिकांचे शासनाने पुनर्वसन केले. मात्र, 7 ते 8 वर्षे होऊनही अनेक गावांमध्ये नागरी सुविधांचा अभाव आहे. येथील कामे निकृष्ठ दर्जाची झाल्याने असंख्य समस्या आहेत. काही गावांमध्ये अजूनही कामे अपूर्णावस्थेत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी या अनेकदा लक्ष वेधले, निवेदनं दिली. मात्र, परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.अनेक कुटूंब आजही टिनाच्या शेडमध्ये राहत आहेत. तालुक्यात बेंबळा प्रकल्पामुळे 14 गावे बुडीत क्षेत्रात आल्याने पुनर्वसित झाली.शासनाने या पुनर्वसित गावात नागरी सुविधांची कामे ...

ग्रामपंचायतीअभावी विकासाला खीळ
पुनर्वसित गावांमध्ये अजूनही ग्राम पंचायती अस्तित्वात न आल्याने गाव विकासाला खीळ बसली आहे. प्रशासकाच्या भरोवशावर ह्या गावात विकासाची कामे मंदावली आहेत. मंजूर हातपंप पूर्ण करण्यात आलेली नाही. कोंडवाड्याची दुर्दशा झाली आहे. प्रकल्पग्रस्तांनकडून मागणी असलेले प्लॉटचे वाटप अद्यापही झालेले नाही.

रस्ते उखडले, रपटे खचले; वीजपुरवठा वारंवार खंडित
पुनवर्सित गावांमधील रस्ते उखडले आहेत. कोल्ही गावात प्रवेश करतांना मोठा खड्डा दिसतो. बांधण्यात आलेल्या गटारांवरील रपटे खचले असून ठिकठिकाणी मध्येच खड्डे पडले आहेत. बेंबळा पुनर्वसित गावात कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे वारंवार पुरवठा खंडित होत आहे. रोहित्र उघड्या अवस्थेत असल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
नेत्यांचे दुर्लक्ष : निवडणूक काळात लोकप्रतिनिधी आश्वासने देतात. मात्र, एकदा निवडून आले, की पुन्हा या भागाकडे फिरकूनही पाहत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे, जमिनीचा त्याग करणा-या प्रकल्पग्रस्ताची थट्टाच होत असल्याचे दिसून येत आहे.