अमरावती- भाईचंद हीराचंद राय
सोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या स्थानिक शाखेचे व्यवहार दहा दिवसांत सुरळीत न झाल्यास योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महिवाल यांनी सहकार विभागाला दिले आहेत. ठेवीदारांच्या वतीने आमदार रवि राणा यांनी गुरुवारी दुपारी जिल्हाधिकार्यांची भेट घेतली.बीएचआर (राजापेठ शाखा) मागील 20-25 दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे बचत खाते, करंट अकाउंटस् व ठेवीदारांच्या चिंता वाढल्या असून, पतसंस्थेच्या व्यवस्थापनातर्फे कोणतेही सहकार्य नसल्याचे संबंधितांचा आरोप आहे.या पार्श्वभूमीवर गुरुवारी खातेधारक व ठेवीदारांनी आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्यांची भेट घेतली.
या वेळी अपर जिल्हाधिकारी किशोर कामुने, सहकारी संस्था नोंदणी खात्याचे जिल्हा उपनिबंधक आणि इतर अधिकारी उपस्थित होते. पतसंस्था जर अडचणीत नसेल, तर ती बंद का ठेवण्यात आली; रोजचे व्यवहार का ठप्प आहेत; निधी असतानाही खातेदारांना विड्रॉल का दिला जात नाही आदी प्रश्न या वेळी ठेवीदार व खातेधारकांनी उपस्थित केले. या सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी दहा दिवसांच्या आत व्यवहार सुरळीत करण्याचे निर्देश सहकार विभागाला दिले आहेत. तसे न झाल्यास कारवाई करा, असेही बजावण्यात आले.
या वेळी राजीव देशमुख, राजाभाऊ बाखडे, सागर सोमानी, सुधाकर उमक, र्शीराम इंगळे, जयर्शी देशमुख, सुजाता देशमुख, प्रकाश बेले, सीमा मुरारका, अशोक पाचुरकर, गजानन मोहोकर, एस. एन. शेवतकर, व्ही. जे. कासट, राजेश राऊत, दिलीप अग्रवाल, गिरीश कोठारी, नितीन शिरसाट, अमितसिंग नखाते, बी. एस. पटिले, विनोद रुंगटे, एम. एस. बैतुले यांच्यासह सुमारे 80 खातेधारक व ठेवीदार उपस्थित होते.