आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बीएचआर’समोर आज ग्राहकांचे आंदोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शहरातील फुटाणे गल्लीतील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट क्रेडीट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीला टाळे लागून तीन आठवडे झाले, मात्र अद्याप बॅकेचे कुणी अधिकारी, कर्मचारी फिरकले नाहीत. तसेच फसगत झालेल्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळतील, असे आश्वासनही बँकेकडून कुणी दिले नसल्याने ग्राहकांचा पारा भडकला आहे.
दरम्यान, काही गुंतवणूकदारांनी आज 29 जूनला जळगाव येथील बॅंकेच्या मुख्यालयासमोर धरणे दिले तसेच बॅंकेचे प्रमुख असलेल्या रायसोनी कुटुंबाच्या घरासमोर निदर्शने केली. मात्र दिवसभरात कुठलाच प्रतिसाद न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी आता आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. व्यवस्थापन, अधिकारी, कर्मचार्‍यांनी सोमवारी बँक उघडली नाही तसेच बंॅकेकडून पैसे देण्याचे आश्वासन मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा फसवणूक झालेल्या ग्राहकांनी दिला आहे.
गत पंधरवड्यापासून येथील फुटाणे गल्लीमधील बीएचआर बँक उघडली नाही. काही चॅनेल्सवर बॅंकेतील गैरप्रकारांच्या बातम्या झळकल्याने ग्राहकांनी दक्ष होऊन बंॅकेकडे धाव घेतली. मात्र तोपर्यत उशिर झाला होता. बॅंकेच्या स्थानिक अधिकार्‍यांनी पहिल्या दोन-चार दिवसात विड्रॉलच्या नावाने हात आखुड घेतले होते. त्यानंतर ग्राहकांकडून पैशाबद्दल आक्रमक विचारपूस होऊ लागल्याने अधिकारी, कर्मचार्‍यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता बॅंकेला टाळे लावले आहे. दरम्यान, याप्रकरणी वडगाव रोड पोलिस स्टेशन, शहर पोलिस स्टेशन आणि पोलिस मुख्यालयी तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या. गुंतवणूकदारांनी बॅकेच्या कर्मचार्‍यांना मुदत दिली, मात्र त्याचा फायदा झाला नाही. याउलट बॅंकेच्या अधिकार्‍यांनी 23 जूनला बॅक उघडण्याचे लेखी आश्वासन जिल्हाधिकार्‍यांना दिले. मात्र बॅक उघडलीच नाही. बॅकेतील कर्मचार्‍यांनी निवेदनाद्वारे जिल्हा यंत्रणेला पोलिस संरक्षण मागितले. मात्र मिळले नाही.

गुन्हे दाखल झाल्यास कायदा आणि प्रशासनाच्या कचाट्यात बॅंकेत गुंतवलेला पैसा येऊ नये याकरिता कुणीही गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी पुढे धजावले नाही. तर प्रशासनानेही याप्रकरणात जास्त स्वारस्य दाखवले नाही. ग्राहकांकडून बॅंकेच्या अधिकार्‍यांना दोनवेळा अल्टीमेटम देऊनही बॅक उघडण्यात आली नाही. त्यामुळे प्रकाश डब्बावार यांच्यासह वारंवार बॅंकेकडे चकरा मारणारे ग्राहक, गुंतवणूकदार शनिवारी बॅंकेच्या जळगाव येथील मुख्यालयाकडे रवाना झाले. दरम्यान, आज 29 जून रोजी बॅकेच्या मुख्यालयासमोर आणि बॅंकेचे सर्वेसर्वा असलेल्या रायसोनी कुटुंबाच्या घरासमोर धरणे देत निदर्शने केली.

पैसा अडकल्याने अस्वस्थ, आता आंदोलन
- मेहनतीचा पैसा बंॅकेत अडकल्यामुळे अस्वस्थ झालो आहो. दिवसातून दहावेळा फोनवरुन एकमेकांना विचारणा सुरू आहे. बॅंकेला भरपूर मुदत दिली. सोमवारी बॅंक न उघडल्यास तीव्र आंदोलन उभे करण्यात येणार आहे. ’’ र्शीकांत ढुमणे, गुंतवणूकदार, यवतमाळ

बड्या गुंतवणूकदारांची चुप्पी
बँकेच्या ग्राहकांनी 20, 23 आणि 26 जूनला तक्रारी देणे आणि बॅंकेपुढे तळ ठोकण्याचे सत्र गतीमान केले होते. यादरम्यान येथे आलेल्या शंभरावर गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. शहरातील प्रतिष्ठीत डॉक्टर्स आणि व्यापार्‍यांचा पैसा बॅंकेत अडकला असल्याचे सांगण्यात येत होते तर एकमेकांकडून त्याची पुष्टीही जोडण्यात येत होती. बड्या गुंतवणुकदारांनी मात्र बंॅकेच्या कार्यालयावर डोळा ठेवला असून कार्यवाहीच्या बाबतीत सावध पावित्रा घेतला आहे.

बँकेच्या कर्मचार्‍यांचा जीव भांड्यात
बंॅकेच्या अधिकार्‍यांबरोबर दैनिक ठेवी जमा करणारे प्रतिनिधी आणि बंॅकेतील कर्मचार्‍यांचा जीव भांड्यात पडला आहे. ग्राहकांनी त्यांच्या घरी जाऊन विचारपूस सुरू केली आहे. प्रशासनाने पोलिस संरक्षण नाकारल्याने या कर्मचारी आणि प्रतिनिधींचे बाहेर निघणे मुश्कील झाले आहे. खुद्द या कर्मचार्‍यांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा पैसा बॅंकेत अडकला आहे. या संकटामुळे कर्मचारी, प्रतिनिधी आणि त्यांचे कुटुंबीय तणावात आहेत.