आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर मुख्यमंत्रीही झाले असते भय्यासाहेब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - माजी खासदार तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक भय्यासाहेब जवादे यांनी मनावर घेतले असते, तर कदाचित त्यांना राज्य मंत्रिमंडळाचे नेतृत्व करण्याची संधीही प्राप्त झाली असती. परंतु, काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असलेल्या जवादे यांनी त्यासाठी विनम्र नकार दिला होता.

1977 मध्ये यवतमाळातून खासदार झालेल्या जवादे यांनी 1952 सालची पहिली विधानसभा निवडणूकही जिंकली होती. त्यावेळी मध्य प्रांत मध्यप्रदेशात (सी.पी. अँड बेरार) समाविष्ट होता. 1952 ते 56 या काळातील सभागृहात त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रतोद पदाचीही जबाबदारी होती. 56 सालच्या निवडणुकीत ते पुन्हा यवतमाळ जिल्ह्यातूनच विजयी झाले. एक मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यामुळे सर्व आमदारांना आपोआपच स्वत:च्या प्रांताचे नेतृत्व करणाची संधी मिळाली. यानंतरची निवडणूक लढवून त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळाचे नेतृत्व करावे, अशी तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सूचना होती. परंतु, त्यांनी विनम्र नकार देत काही वर्षे पुन्हा पक्ष संघटनेत घालवली आणि 1977 साली ते संसदेत पोहोचले.