आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैव बलवत्तर म्हणून बचावला भानुदास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘भूमिगत२३० केव्ही जीवंत विद्युत वाहिनीच्या रबरी आवरणावर भानुदासच्या कुदळीचा वार झाल्याबरोबर शॉर्ट सर्किटसारखा आवाज होऊन आगीच्या ज्वाला बाहेर पडल्या. त्याने प्रसंगावधान राखून तत्काळ कुदळी हातातून सोडली’. अमरावती येथील विभागीय आयुक्तालयाच्या परिसरातील हा प्रसंग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २२ तारखेला अमरावीत दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाच्या परिसरात साफसफाईचे काम सुरू आहे.

संंबंधीत कंत्राटदाराने या कामासाठी मेळघाटातून श्रमिक आणले आहेत. इमारतीच्या दर्शनी भागात कंत्राटदाराने खोदकाम करण्यास सांगितले. येथे भूमिगत विद्युतवाहिनी असल्याचे त्याच्या ध्यानिमनीही नव्हते. मेळघाटातील चुनखडी येथील भानूदास याने कुदळीचा वार केल्याबरोबर आगीच्या ज्वाला बाहेर पडाव्यात, तसे दृष्य निर्माण झाले. कुदळीला लाकडी दांडा असल्याने थोडक्यात भानूदासचा जीव बचावला. अन्यथा, अनर्थ ओढवला असता, अशी प्रतिक्रिया तेथे जमलेल्या नागरिकांनी व्यक्त केली.

सुरक्षिततेची खबरदारी नाही : विभागीयआयुक्त कार्यालयात येणाऱ्या विद्युतवाहिनीवर कुदळीचा वार झाला. कंत्राटदाराने खोदकामास सुरूवात करण्याअगोदर विद्युतवाहिनीबद्दल माहिती घेतली असती तर हा प्रसंग टळला असता. भविष्यात, असे प्रसंग टाळण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.