आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bharat Sanchar Nigam Limited Office Fire Issue, Divya Marathi

‘बीएसएनएल’ कार्यालयात आग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भारत संचार निगम लिमिटेडच्या श्याम चौकाजवळील कार्यालयात बुधवारी (ता. 23) सकाळी आग लागली. कार्यालयीन कामकाज सुरू होण्यापूर्वी ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचा बंब कार्यालय परिसरात दाखल झाला.

कार्यालयातील तिसर्‍या माळ्यावरील एका कक्षात ही आग लागल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. आगीमुळे भारत संचार निगमचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात बीएसएनएल कार्यालयाशी संपर्क साधला असता, आग लागल्याचे तेवढे सांगण्यात आले. मात्र, आग कशामुळे लागली, कुठे लागली, त्यात किती नुकसान झाले, या बाबत माहिती देण्याचे टाळण्यात आले.