आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय स्पर्धेत भीम बारसे कांस्यपदकाचा मानकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- युवक व क्रीडा मंत्रालय, नेहरू युवा संघटन, राष्ट्रीय सेवा योजना व पंजाब सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठ येथे झालेल्या 18 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवातील वक्तृत्व स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार्‍या अमरावतीच्या भीम बारसेने कांस्यपदक पटकावले. बारसेने संपूर्ण देशात तिसरा क्रमांक प्राप्त करून अमरावतीचा नावलौकिक वाढवला आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत अमरावती विभागाचे नेतृत्व करून त्याने राज्यात प्रथम स्थान पटकावले होते. त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

राष्ट्रीय स्पर्धेत 27 राज्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. त्यातून भीम बारसेने कांस्यपदक पटकावले. केंद्रीय क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या हस्ते धनादेश, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून बारसेचा गौरव करण्यात आला. या यशाबद्दल राज्याचे युवक व क्रीडा आयुक्त पंकज कुमार, क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी भीमचे अभिनंदन केले आहे.

भीमने या यशाचे र्शेय आई-वडील, विद्यापीठ कला व रंजन मंडळाचे अध्यक्ष प्रा. एस. टी. देशमुख, क्रीडा मंडळाचे संचालक डॉ. अविनाश असनारे, प्राचार्य डॉ. विजय भांगडिया, डॉ. रजनी देशमुख, डॉ. कुणाल इंगळे, डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. अरुणा वाडेकर, प्रा. एम. गवई, प्रा. शीतल तायडे, प्रा. कातेश्वर ढोबळे यांना दिले आहे.