आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्ष लागवडीचा बिहार पॅटर्न होतोय आता यशस्वी, दृष्टिक्षेपात अशी आहे योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवडीकरिता राज्य सरकारने सुरू केलेला बिहार पॅटर्न अमरावती विभागात यशस्वी होत असल्याचे प्रारंभिक चित्र आहे. या नव्या पॅटर्नमुळे रोजगार मिळत असून, पर्यावरणाचा समतोल राखले जात आहे.
बेरोजगारांना ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सामाजिक वनिकरण विभागाने सुरू केलेल्या या विशेष मोहिमेत मागील पाच वर्षांत ११ लाख वृक्ष अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात लावले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा कडुनिंब आणि पिंपळ या दोन वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. बिहार पॅटर्न नुसार महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या साहाय्याने ही वृक्ष लागवड केली आहे.
जिल्ह्यांना जोडणारे रस्ते आणि महामार्गांवर वृक्ष लागवड केली आहे. या अंतर्गत अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या पाचही जिल्ह्याअंतर्गत सर्वच रस्त्यांवर वृक्ष लागवड करण्यात येणार अाहे,अशी माहिती सामाजिक वनिकरण विभागाचे मुख्य वनसंरक्षक आर. एन. रॉय यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
संरक्षकमजुराची नियुक्ती : २००झाडांकरिता एक संरक्षक मजूर रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केल्यानंतर झाडांची देखभाल करण्याकरिता एका संरक्षक मजुराची नियुक्ती करण्यात येते. २०० वृक्षांना दररोज पाणी देणे आणि देखभाल करणे एवढेच काम या मजुरांकडे असते. झाडे लावल्यानंतर तीन वर्षे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजुरांकरवी झाडांची देखभाल करण्यात येते. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळाला आहे.
मजुरांची भटकंती थांबण्यास मदत
ग्रामीणभागात रोजगार निर्मिती २०११ च्या पावसाळ्यापासून राज्यात सर्वप्रथम अमरावती विभागात बिहार पॅटर्नने वृक्ष लागवडीची ही योजना सुरू केली. त्यानंतर राज्यात २०१२ ला योजना कार्यान्वित केली. सामाजिक वनिकरण विभागामार्फत रोपटे उपलब्ध करून देण्यात येतात, तर वृक्ष लागवड करण्याकरिता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मजूर उपलब्ध करून देण्यात येतात. त्यामुळे या योजनेत मजुरांना मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध आहे. ग्रामीण लोकांना गावाजवळ रोजगार उपलब्ध झाल्यामुळे मजुरांची भटकंती थांबण्यास मदत झाली.
तीन वर्षे झाडांची देखभाल, संगोपन करणार आहे
झाडे जगण्याचे प्रमाण वाढले यापूर्वी झाडे लावल्यानंतर देखभाल होत नसल्याने झाडांची दुर्दशा होत होती. मात्र, आता बिहार पॅटर्नमुळे सतत तीन वर्षे झाडांची देखभाल आणि संगोपन केले जात असल्याने झाडे जिवंत राहण्याचे प्रमाण शंभर टक्के झाले आहे. आर.एन. रॉय, मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनिकरण.