आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिजवाई सोयाबीन बाजारात- दर 4,180

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बिजवाईच्या सोयाबीनला गुरुवारी विक्रमी 4,180 रुपये भाव मिळाला. बियाण्यांच्या सोयाबीनचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे पेरणीपूर्वी सोयाबीनचे दर वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा दर्जा मोठय़ा प्रमाणात खालावल्यामुळे यावर्षी बियाण्यांच्या सोयाबीनसाठी शेतकर्‍यांना धावाधाव करण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या बाजारात बिजवाईच्या सोयाबीनची चढय़ा दराने खरेदी होत असून, हेच सोयाबीन चढय़ा दराने पेरणीच्या वेळी पुन्हा बाजारात येणार आहेत. त्यामुळे बियाण्यांचे भाव तडकण्याची चिन्हे दिसत आहेत. गुरुवारी बाजारात सात हजार 468 सोयाबीनच्या पोत्यांची आवक झाली. सोयाबीनला किमान 3,450, तर कमाल 3,590 रुपये भाव मिळाला. पावसाचा फटका बसलेल्या सोयाबीनला किमान 2,500 तर कमाल 3,300 रुपये दर मिळाला.
दरम्यान, बिजवाईच्या सोयाबीनला किमान 3,650 तर कमाल 4,180 रुपये दर मिळाला. मागील हंगामात कंपन्यांच्या सोयाबीनचे भाव जास्त असल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी घरी राखून ठेवलेलेच बियाणे पेरले होते. परंतु, यावर्षी बहुतांश सोयाबीनला पावसाचा तडाखा बसल्यामुळे शेतकर्‍यांकडे बियाण्यांचे सोयाबीनच उरले नाही. उशिरा पेरलेले सोयाबीन चांगले असल्याने बहुतांश शेतकर्‍यांनी अशा सोयाबीनचा साठा करून ठेवला आहे. पेरणीपूर्वी या सोयाबीनला गावातच चांगला दर मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, बहुसंख्य सोयाबीन पावसाने खराब झाल्यामुळे शेतकर्‍यांची बियाण्यांसाठी फरपट होण्याची शक्यता आहे.
नवीन हरभरा 2,721 रुपये : बाजारात नवीन हरभर्‍याच्या 290 पोत्यांची आवक झाली. त्याला किमान 2,500 तर कमाल 2,721 रुपये दर मिळाला. ज्ॉकी हरभर्‍याला किमान 2,600 रुपये दर मिळाला. जुन्या हरभर्‍याला किमान 2,200 रुपये दर मिळाला.
तुरीची आवक 9,961 पोते : बाजारात गुरुवारी नवीन तुरीच्या 9,961 पोत्यांची आवक झाली. दरम्यान, तुरीचे भाव 50 रुपयांनी कमी होऊन कमाल 4,250, तर किमान भाव 3,500 रुपये दर मिळाला.