आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला बडनेरात ३५ वर्षांनंतर निवडणूक लढण्याची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघात भाजपला तब्बल ३५ वर्षांनंतर निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी, बडनेरा मतदारसंघातून १९८० मध्ये भाजपचे रियाज अहमद मोहम्मद युसूफ यांनी निवडणूक लढवली होती.
त्यानंतर १९८५ मध्ये बडनेरातून भाजपचा कोणताही उमेदवार निवडणूक रिंगणात नव्हता. १९९० मध्ये शिवसेनेशी युतीनंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आला होता. त्या वेळी प्रदीप वडनेरे विजयी झाले होते. तेव्हापासून हा मतदारसंघ शिवसेनेच्याच ताब्यात होता. मात्र, या विधानसभा निवडणुकीत महायुती तुटल्यामुळे बडनेरा मतदारसंघात भाजपला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली असून, भाजपने तुषार भारतीय यांना उमेदवारी दिली आहे.
मध्यंतरीच्या काळात दोन्ही पक्षांनी अदलाबदलीचे प्रयोग केले. त्या वेळी १९८० मध्ये अमरावती, मेळघाट, बडनेरा आणि चांदुर रेल्वे या चार मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर १९८५ मध्ये मेळघाट आणि चांदूर रेल्वे या दोनच ठिकाणी भाजपला उमेदवार मिळाले होते. बडनेरा वगळता अन्य ठिकाणी भाजपने त्यानंतरच्या निवडणुकीतही उमेदवार उभे केले होते. मात्र, फक्त बडनेरा मतदारसंघ तेव्हापासून शिवसेनेच्याच ताब्यात राहिला आहे.

काँग्रेस,शिवसेनेचे वर्चस्व
बडनेरा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व होते. या मतदारसंघात आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा काँग्रेसचा विजय झाला, तर त्या खालोखाल तीन वेळा शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं आणि युवा स्वाभिमान यांना प्रत्येकी एक वेळा संधी मिळाली आहे.