आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा ऑक्टोबरला अमरावतीत, पंतप्रधान नरेंद्र मोदींची १० ला चांदूर रेल्वे येथे सभा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पंतप्रधाननरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (दि. १०) अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.ब्रह्मपुरी येथील जाहीर सभा आटोपून मोदी यांचे चांदुर रेल्वे येथे आगमन होणार आहे, तर चांदुर येथील सभेनंतर हिंगोली येथील सभेकरिता मोदी रवाना होणार आहेत. अमरावती, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील मतदारसंघाकरिता चांदुर रेल्वे हे ठिकाण मध्यवर्ती आहे. त्यामुळे अमरावतीऐवजी ही मोदींची सभा चांदुर रेल्वे येथे आयोजित करण्यात आल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.
चांदुर रेल्वे-कुऱ्हा मार्गावरील शेतात दुपारी १२ वाजता जाहीर सभा होणार आहे. भाजपकडून मोदींच्या सभेचा अधिकृत कार्यक्रम पोलिस विभागाला मिळाल्याचे चांदुर रेल्वेचे उपविभागीय पोलिस अधिकारी किरण धोटे यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची येत्या गुरुवारी (दि. ९) अमरावतीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
स्थानिक सायन्स्कोअर मैदानावर दुपारी तीन वाजता ही सभा होणार असल्याचे भाजप कार्यालयातून कळवण्यात आले आहे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची धारणी आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यांत सात ऑक्टोबरला दोन जाहीर सभा होणार आहेत. नरेंद्र मोदी, अमित शहा या दोन्ही भाजपमधील िदग्गज नेत्यांच्या सभांची आता अमरावतीकरांना उत्सुकता लागली आहे.