आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP North India's Leading Rally In Vidarbha Region

उत्तर भारतीय आघाडीची रथयात्रा, अकोला, अमरावती, यवतमाळ येथे सभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘भारतीय जनता पक्षामधील उत्तर भारतीय आघाडीच्या ठाणे ते नागपूर सदस्य नोंदणी मोहिमेचा दुसरा टप्पा येत्या गुरुवार, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. ठाणे जिल्ह्यातील काशिमीरा येथून १९ फेब्रुवारीला उत्तर भारतीय आघाडीची सदस्य नोंदणी अभियान रथयात्रा सुरू होणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्यात सदस्य नोंदणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात जळगाव, खामगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ चंद्रपूर मार्गे रविवार, २२ फेब्रुवारीला नागपुरात रोड शो आणि दुपारी १२ वाजता सदस्य नोंदणी यात्रेचा समारोप होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी यात्रेचे केंद्रीय लघू उद्योग मंत्री कलराज मिश्रा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आणि महिला बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यात काशिमीरा येथे रथयात्रेला हिरवी झेंडी दाखवण्यात येईल. या वेळी उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष आर. डी. यादव, जयप्रकाश ठाकूर आणि नरेंद्र मेहता हे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पुढील चार दिवस ही रथयात्रा ठाणे ते नागपूर असा प्रवास करणार आहे. यात्रेदरम्यान ठिकठिकाणी जाहीर सभांचे आयोजन केले आहे. या सभांना चिराग गुप्ता, नीरज मिश्रा, मुलचंद शुक्ला, मुकुंद कुलकर्णी, धर्मेंद्रनाथ ठाकूर, प्रद्युम्न शुक्ला संबोधित करणार आहे. यात्रेदरम्यान अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ जिल्ह्यात सभा होणार आहेत.
रथयात्रेचा मार्ग
गुरुवार,१९ फेब्रुवारीला काशिमीरा, खर्डी, धुळे, जळगाव, शुक्रवार, २० फेब्रुवारीला जळगाव (ग्रामीण), खामगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ , शनिवार, २१ फेब्रुवारीला यवतमाळ (ग्रामीण), चंद्रपूर, नागपूर आणि रविवार, २२ फेब्रुवारीला नागपुरात रोड शो आणि दुपारी १२ वाजता सदस्य नोंदणी यात्रेचा समारोप होणार आहे.