अमरावती- भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष
अमित शहा, ‘ड्रीम गर्ल’ हेमामालिनी आणि केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याने भाजपच्या स्टार प्रचारकांनी शहरातील प्रचाराकडे पाठ तर फिरवली नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रचाराला खूपच कमी अवधी शिल्लक राहिला असताना अमित शहा यांच्यानंतर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी यांची सभादेखील रद्द करण्याची वेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर आली.
एका दिवसामध्ये घेतल्या जाणाऱ्या सभांसाठी मर्यादा येत असल्याने काही ठिकाणच्या सभा रद्द करण्याची वेळ राजकीय पक्षांवर येत आहे. निसर्गाने साथ देण्याचे फार कमी उदाहरण आहेत; परंतु नियोजित वेळेपर्यंत सभेच्या ठिकाणी पोहोचणे शक्य नसल्याने जिल्ह्यात अनेक स्टार प्रचारकांच्या सभा रद्द झाल्याची उदाहरण आहेत. नऊ ऑक्टोबरला दसरा मैदानावर आयोजित सभेच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने अमित शहा गैरहजर राहिले. तुषार भारतीय यांच्या प्रचारासाठी रविवारी किरणनगरातील नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टच्या मैदानावर स्मृती इराणी यांची सभा आयोजित केली होती. दुपारी बारापासून तीन वाजेपर्यंत नागरिक इराणी यांना बघण्यासाठी ताटकळत सभास्थळी उपस्थित होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा दौरा रद्द झाल्याने भाजप समर्थकांचा मात्र हिरमोड झाला.
स्मृती ईराणी यांना पाहण्यासाठी ताटकळत असलेला महिला वर्ग.बाजूला तैनात पोलिस ताशावाले.
पोलिस यंत्रणा ताटकळत
तीनते चार तासांचा कालावधी लोटल्यानंतरदेखील स्मृती इराणी आल्याने पोलिस अस्वस्थ झाले होते. पोलिसांनादेखील मिळेल त्याठिकाणी आसरा घ्यावा लागला.
ताशे, फटाके वाजलेच नाहीत
केंद्रीयमंत्री स्मृती इराणी प्रचारासाठी येणार असल्याने कार्यकर्त्यांनी ताशे आतषबाजीसाठी फटाक्यांची व्यवस्था केली होती. मात्र, स्मृती इराणी आल्याने ताशे वाजलेच नाहीत, शिवाय फटाक्यांची आतषबाजीदेखील झाली नाही.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वक्त्यांनी सांभाळली बाजू