आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादूटोणाविरोधी विधेयकाला विरोध; पुरोहितांच्या कृती समितीचे निवेदन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या ‘महाराष्ट्र नरबळी, अमानुष, अनिष्ट, अघोरी आणि जादूटोणा’ यांना प्रतिबंध घालण्याबाबत तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अध्यादेश 2013 च्या विरोधात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना निवेदन देण्यात आले. पुरोहितांच्या कृती समितीने सोमवारी हे निवेदन दिले.
भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्यदेखील प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य शासनाचा हा अध्यादेश घटनाबाह्य आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हादेखील मूलभूत अधिकार आहे. त्याच्या विरोधात हा अध्यादेश असल्याचे निवेदनकर्त्यांचे म्हणणे आहे. जिल्हाधिकार्‍यांना मोरेश्वर घैसास, कृष्ण आर्वीकर, भूषण जोशी, विवेक गोडबोले, प्रकाश दांडगे, नितीन जोशी, र्शीकृष्ण पराडकर, सुरेश काणे, मंगेश पोळ, दिनेश पाठक, अनंत जोशी, कृष्ण पळसकर, प्रमोद दीक्षित, चंद्रशेखर जोशी, विश्वास भिडे, श्रीराम धानोरकर यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले.