आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद घरात सिलिंडरचा अचलपूर येथे स्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- अचलपूरनगर परिषदेच्या परिसराला लागून असलेल्या गौरखेडा कुंभी ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या रवीनगर येथील बंद घरात घरगुती वापराच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
प्राप्त माहितीनुसार, रवीनगर येथील नारायण चंदेल यांच्या बंद घरातून सोमवारी (दि. २९) अचानक दुपारी बारा ते एकच्या सुमारास मोठा स्फोट होऊन धुराचे लोट निघत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्वरित नगर परिषदेला आग लागल्याची माहिती दिली. सुदैवाने घरात कुणीच नसल्याने मोठा अनर्थ टाळला. घरातील सदस्यांनी सिलिंडरचे रेग्युलेटर बंद करता घर बंद करून बाहेर निघून गेले. स्फोटामुळे घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

घरात आणखी सिलिंडर
नारायणबुंदेले यांच्या घरात घरगुती वापराच्या सिलिंडरचा स्फोट झाला, त्या वेळी घरात आणखी दोन सिलिंडर असल्याचे बोलल्या जात आहे. वित्तहाणी झाली असली, तरी या स्फोटामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
बंद घरात झालेल्या सिलिंडर स्फोटामध्ये असे नुकसान झाले.