आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांच्या कल्पक रचनेतून फुलली रसिकांची मने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विविधरंगी आकारांमध्ये करण्यात आलेली आकर्षक पुष्परचना... फुलांचा मनमोहक दरवळ... मनाला प्रसन्नता प्रदान करणाऱ्या गुलाबापासून ते अॅस्टरपर्यंत मांडण्यात आलेल्या फुलांनी रसिकांची मने अक्षरश: फुलून गेली होती. निमित्त होते संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृहात ब्लॉसम-ए ग्रुप ऑप क्रिएटिव्हिटीतर्फे भरवण्यात आलेल्या पुष्परचना प्रदर्शनाचे.
प्रदर्शनामध्ये ‘धवल रंग सुमनाचा’,‘ हिरवा भाजीपाला,’ ‘झाडे वाचवा, प्राणी वाचवा,’ ‘रक्तदान करा’ आदी थीमवर आधारित पुष्परचना करण्यात आली होती. आर्ट गॅलरीत दाखल होणारा प्रत्येकजण हे सौंदर्य अनुभवून सुखावून जात होता. शुष्करचना, स्वच्छता अभियान, मुक्तछंद, स्वच्छंद योगासन अशा विविध रचनेत फुलांची मांडणी करून ती प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. स्त्रियांमध्ये फूलझाडांप्रती आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ब्लॉसम- ग्रुप ऑफ क्रिएटिव्हिटीतर्फे मागील सात वर्षांपासून पुष्परचना प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. प्रा. वसुधा बोबडे, डॉ. छाया बोबडे, डॉ. नीता ठाकरे, अलका गभणे, डॉ. शर्मिला कुबडे, रंजना झोंबाडे रिता पाळेकर या सात महिलांनी आपल्या कल्पकतेतून ही दर्जेदार प्रदर्शन तयार केले आहे. पर्यावरणवेड्या या सात महिलांनी आपल्या कल्पकतेतून आतापर्यंत सुशोभित दर्जेदार प्रदर्शनाचे आयोजन करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. महिलांमध्ये पर्यावरणप्रती आवड निर्माण व्हावी, हाच एकमेव उद्देश या महिलांचा आहे.
पर्यावरणाचे संरक्षण संवर्धनाची गरज लक्षात घेऊन हा ग्रुप काम करतो. स्त्रियांमध्ये फूलझाडांप्रती आवड निर्माण व्हावी; तसेच त्यांचे निसर्गाशी नातं अतूट राहावं, या उद्देशाने हा ग्रुप नेहमी महिलांसाठी प्रेरणा देणारा ठरला आहे. कल्पकतेतून महिलांना बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात त्यांच्यात एखाद्या छंदाप्रती आवड निर्माण होते. प्रा.वसुधा घुरडे, अध्यक्ष,ब्लॉसम ग्रुप. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी आयोजित पुष्पप्रदर्शनातील मोहकता न्याहाळताना मुलंही हरवून गेली होती. ब्लॉसम ग्रुपतर्फे भरवण्यात आलेल्या पुष्पप्रदर्शनामध्ये मुक्तछंद, स्वच्छंद, शुष्करचना, योगासन या विविध प्रकारांमध्ये पुष्परचना सादर करण्यात आल्या.