आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तके शाळेतून, कव्हर बाजारातून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील वह्या, पुस्तक इतर शालेय साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी नवीन शैक्षणिक सत्र सुरू होणार म्हणून लाखाे रुपयांचा माल भरून ठेवला. मात्र अलिकडे शाळेतूनच विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके मिळत असल्याने विक्रेत्यांकडे ग्राहक फिरकताना दिसत नाहीत. सध्या पुस्तके शाळेतून तर, केवळ कव्हर बंडल इतर किरकोळ साहित्य बाजारातून खरेदी करताना ग्राहक दिसत आहेत. सरकारच्या धोरणामुळे पुस्तक विक्रीचा व्यवसाय ठप्प झाल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिल्या आहेत.
पुर्वी शाळा सुरू होण्याअगोदर वह्या पुस्तके इतर शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारात विद्यार्थी पालकांची गर्दी राहत असे. मात्र जिल्हा परिषद, महापालिका इतर शासनमान्य शाळांमध्ये पुस्तके आणि शालेय साहित्य मिळत असल्याने बाजारातील विक्रेत्यांकडे सहसा कुणी फिरकत नाही. शनिवारी (दि. २०) शहरातील बाजारपेठेचा आढावा घेतला असता. शालेय साहित्य खरेदीला ढिम्म प्रतिसाद असल्याने विक्रेत्यांनी नाराजीचा सूर व्यक्त केला.
या वस्तूंची होत आहे खरेदी
शालेय विद्यार्थ्यांसाठी रेनकोट, छत्री, िटफिन बॉक्स, स्कुल बॅग या वस्तूंची सध्या बाजारात खरेदी होताना दिसत आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्टून कॅरेक्टर असणाऱ्या स्कुल बॅग बाजारात दाखल झाल्या आहेत. १०० ते २५० रुपयांपर्यंत स्कुल बॅग मिळत आहे, तर २०० ते ६०० रुपयांपर्यंत कॉलेज बॅग उपलब्ध आहे.

शाळेमधून चढ्या दराने होतेय विक्री : शाळेमधून विकण्यात येणाऱ्या शालेय साहित्यांची चढ्या दराने विक्री होत असल्याची तक्रार पालकांनी केली आहे. पुस्तकांना लावण्यात येणाऱ्या कव्हरच्या रोल बंडलची किंमत बाजारभावापेक्षा चढ्या दराने करण्यात येते.
शिक्षक करतात टॉर्चर
शाळेत वह्या, पुस्तकांसाठी शुल्क भरून शाळेतूनच शालेय साहित्य घ्या, अशी जणू पालकांसाठी सक्तीच झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणने आहे. आपल्या पाल्यासाठी जर शाळेतून पुस्तके घेतले नसतील तर, विनाकारण शिक्षक त्यांना त्रास देतील, अशी भिती पालक बोलून दाखवतात, हे सुद्धा विक्रेत्यांनी सांगितले आहे.
हा प्रत्यक्ष अनुभव
राजापेठ येथे एका शालेय साहित्य दुकानात विक्रेते आपल्या व्यवसायातील नाराजीचा सूर सांगत होते. किरकोळ साहित्याशिवाय ग्राहक खरेदी करत नसल्याचे त्यांचे मत होते. याच ठिकाणी दहा मिनिटाच्या कालावधीत आलेल्या तीन ग्राहकांनी दुकानात केवळ कव्हर लावण्यासाठी रोलची मागणी केली.
व्यवसाय झाला ठप्प
- ग्राहक परत फिरू नये म्हणून अंकलिपीपासून ते महाविद्यालयापर्यंतची सर्व पुस्तके ठेवावे लागतात. मात्र खरेदीसाठी हा व्यवसाय पुर्वीसारखा राहिल्या नसल्याने दरवर्षी हजारो रुपयांची पुस्तके शिल्लक राहतात. शासनाच्या धोरणामुळे हा व्यवसाय ठप्प झाला आहे.
विलास सोनकुसरे, व्यावसायिक
बातम्या आणखी आहेत...