आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाचखोर जमादार ठाण्यातच ‘ट्रॅप’, गाडगेनगर ठाण्यात ‘एसीबी’ची कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शुक्रवारी गाडगेनगर पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस जमादाराला दोन हजार रुपयांची लाच घेताना रंगेहातथ पकडले. एका अपघात प्रकरणातील दुचाकी सोडवण्यासाठी लाच मागितल्याचा जमादारावर आरोप आहे. या कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पांडुरंग नारायण धंडारे (४७, रा. स्वावलंबीनगर, अमरावती) (बनं. ६२५) असे एसीबीने पकडलेल्या पोलिस जमादाराचे नाव आहे. २० ऑगस्टला गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील बाबा कॉर्नर परिसरात तक्रारदार भीमराव सदाशिव दहिवाडे (रा. तपोवन) यांच्या मुलीकडून अपघात झाला होता. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी मुलीकडून दुचाकी (एमएच२७ एयू ६४३६) जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास गाडगेनगर ठाण्यात कार्यरत जमादार पांडुरंग धंडारे यांच्याकडे होता. दहिवाडे यांनी जप्त करण्यात आलेली दुचाकी परत घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, दुचाकी परत पाहिजे असल्यास दोन हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी धंडारे यांनी केली. त्यामुळे दहिवाडे यांनी एसीबीकडे या प्रकरणाबाबत तक्रार केली होती. एसीबीने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गाडगेनगर ठाण्यातच सापळा रचला.दहीवाडे यांच्याकडून दोन हजार रुपयांची लाच स्विकारत असताना दबा धरुन बसलेल्या एसीबी पथकाने धंडारे यांना रंगेहात पकडले. प्रकरणामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे काय? याची माहिती लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून घेण्यात यते आहे. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या नेतृत्वात एसीबी पथकाने ही कारवाई केली आहे. ठाण्यातच लाच घेण्याची अलिकडच्या काळातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलल्या जात आहे.