आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bribing Case News In Marathi, Divya Marathi, Anti Corruption Burau Chief

फितूर होणार्‍या सरकारी साक्षीदारांविरुद्ध होणार कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लाच प्रकरणाच्या खटल्यांमध्ये सरकारी साक्षीदार फितूर होतात. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये शिक्षेचे प्रमाण बरेच कमी आहे. यापुढे अशा फितूर होणार्‍या साक्षीदारांवरच कारवाई होईल. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गुरुवारी अमरावतीत प्रसार माध्यमाशी संवाद साधताना ही माहिती दिली.


एसीबीचे महासचांलक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर दीक्षित गुरुवारी पहिल्यांदा अमरावतीत आले होते. प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी सरकारी कर्मचारी साक्षीदार म्हणून सोबत असतात. प्रकरण न्यायालयात सुरू झाल्यानंतर अनेक प्रकरणांत सरकारी साक्षीदार फितूर होतात त्यामुळे लाच घेणार्‍यांना शिक्षा होत नाही. यापुढे फितूर होणार्‍या अशा सरकारी साक्षीदारांविरुद्ध कठोर कारवाई होईल. तशी उपाययोजना करण्यात आली आहे. राज्यात लाच घेणार्‍यांना शिक्षेचे प्रमाण 26 टक्के आहे. तथापि, ही आकडेवारी समाधानकारक नाही. नागरिकांनी निर्भय होऊन आमच्याकडे लाच मागणार्‍यांची तक्रार करावी, असे दीक्षित या वेळी म्हणाले.बैठकीला अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अरविंद साळवे उपस्थित होते.