आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Budget News In Marathi, Amravati Municipal Corparation Budget Issue, Divya Marathi

अमरावती मनपाचे बजेट 546.78 कोटींचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महानगरपालिकेचा 2014-15 या आर्थिक वर्षासाठीचा 546.78 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला. आयुक्त अरुण डोंगरे यांनी स्थायी समिती सभापती सुगनचंद गुप्ता यांच्याकडे अर्थसंकल्प सोपवला.

2014-15 या वर्षात मनपाकडे महसुली 35.52 कोटी, तर भांडवली 33.03 कोटी तसेच असाधारण ऋण व निलंबन 3.03 कोटी अशी एकूण प्रारंभिक शिल्लक 71.58 कोटी रुपये राहणार आहे. 263.39 कोटी रुपये महसुली उत्पन्न, 204.51 कोटी रुपये भांडवली तसेच असाधारण ऋण व निलंबन उत्पन्न 7.30 कोटी रुपये मिळून सर्व बाजूंनी महापालिकेला 475.20 कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होणार आहे.

प्रारंभिक शिल्लक व उत्पन्न मिळून 546.78 कोटी रुपयांचे उत्पन्न मनपाकडे राहील. आगामी वर्षात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य व महसुली उत्पन्नाच्या वाढीवर विशेष भर दिला जाणार आहे. मनपा शाळांमध्ये ई-लर्निंगची संकल्पना प्रायोगित तत्त्वावर राबवली जाणार असून, सात शाळांमधील सेमी इंग्रजी सुविधेत वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. आरोग्य सुविधेत वाढ करण्यासाठी भाजी बाजार येथील मनपा दवाखान्यात एक्स-रे मशीन उपलब्ध करून दिली जाणार असून, बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमधील शल्यक्रिया वॉर्डाचे नूतनीकरण प्रस्तावित आहे. विविध बांधकामांचा दर्जा व गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने दक्षता व गुणनियंत्रण पथक आणि प्रयोगशाळा निर्माण केली जाणार आहे. मालमत्ता कर भरण्याची सुविधा पाचही झोनमध्ये आरंभ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बसची संख्या वाढवण्यात येणार आहे