आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Builders Association Work For Amravti Become 'smart City'

बिल्डर असोसिएशनला आता ध्यास ‘समृद्ध अमरावती’चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भविष्यातील अमरावती कसे असावे; कसे असेल, याचा वेध घेण्यासाठी अमरावती बिल्डर असोसिएशनने (एबीए) आता समृद्ध अमरावती योजनेचा ध्यास घेतला आहे. दोन ऑगस्टला परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशनच्या हॉलमध्ये हा परिसंवाद दुपारी चारला होणार आहे. खासदार आनंदराव अडसूळ परिसंवादाला उपस्थित राहतील. शहराच्या विकासाचा मुद्दा या परिसंवादात केंद्रस्थानी असेल. विविध क्षेत्रांतील सुमारे 15 जाणकार व्यक्ती परिसंवादात आपले विचार व्यक्तकरतील.

समृद्ध अमरावतीचे स्वरूप
शहर, ग्रामीण भागांच्या विकासात स्थापत्य अभियांत्रिकीचे मोलाचे योगदान आहे. शहरातील उंच इमारती, प्रशस्त रस्ते, पूल, उड्डाणपूल, सौंदर्यीकरण, मूलभूत सुविधा यांतील महत्त्वाचा घटक आहे. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बिल्डर्स असोसिएशनदेखील पुढाकार घेत आहे. त्यासाठी शहराचा विकास आराखडा तयार करण्यासाठी असोसिएशन ‘समृद्ध अमरावती’ योजना राबवत आहे.

वेलकम पॉइंटचे सौंदर्यीकरण
एबीएने शहरातील वेलकम पॉइंटच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले आहे. लवकरच त्याचा लोकार्पण सोहळाही पार पडणार आहे. असेच उपक्रम शहरात अन्यत्र राबवण्यासाठीही असोसिएशन पुढाकार घेणार आहे.
एबीएचा पहिला सामाजिक प्रयत्न
बिल्डर असोसिएशनतर्फे अमरावतीत अशा प्रकारचा पहिलाच सामाजिक परिसंवादात्मक उपक्रम राबवला जात आहे. त्यातून अॅक्शन प्लान तयार करता येऊ शकेल, असा प्रयत्न आहे. शैलेश वानखडे, अध्यक्ष, एबीए
परिसंवादातील वक्ते
1. सुरेश जैन, अध्यक्ष, चेंबर्स ऑफ कॉर्मस : व्यावसायिक विकास.
2. किरण पातुरकर, अध्यक्ष, विदर्भ इंडस्ट्री असोसिएशन : औद्योगिक विकासाच्या संधी.
3. राजेंद्र टेंबे, विश्वस्त एकवीरा देवी संस्थान : पौराणिक व पर्यटन विकास.
4. रणजित बंड, अस्पा बंड सन्स : ऑटो मोबाइल मार्केट हब.
5. डॉ. प्रदीप लढके, प्राचार्य सीपना कॉलेज : इंजिनिअरिंग शिक्षणाचे भवितव्य.
6. डॉ. प्रफुल्ल कडू, अध्यक्ष, आयएमए : अमरावतीमधील आधुनिक वैद्यकीय सोयी-सुविधा.
7. राम पंडागळे, माजी उपशिक्षणाधिकारी : शिक्षणाचे भविष्यातील बदलते स्वरूप.
8. उमेश बोरखडे, श्रीपाद हॉटेल : हॉटेलिंग मॅनेजमेंटचे बदलते विश्व.
9. अरविंद देशमुख, प्राचार्य, श्रीराम कॉलेज : एज्युकेशन हबचे स्वप्न.
10. मिलिंद देशमुख, संचालक, अष्टविनायक एजन्सी : भविष्यातील विकासाच्या वाटा.
11. डॉ. अविनाश सावजी, अध्यक्ष, प्रयास संस्था : अमरावती काल, आज आणि उद्या.
12. संजय जाधव, जाधव ग्रुप ऑफ इंजिनिअरिंग : अभियांत्रिकी व्यवसायातील बदलते स्वरूप.
13. विश्वजित तुळजापूरकर, आर्किटेक्ट : कसे असेल भविष्यातील अमरावती.
14. गजानन बारबुद्धे, कृषी उत्पादक : भविष्यातील शेती किती शाश्वत?