आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८७ वर्षांपूर्वी बांधलेल्या वसाहतीत पोलिसांचे वास्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात उपलब्ध असलेली शासकीय निवासस्थाने ही अनेक वर्षांपूर्वी बांधण्यात आल्यामुळे सध्या ती मोडकळीस आली आहेत. खिडक्या फुटलेल्या तर दारं तुटलेली असतानाही पोलिसांना या निवासस्थानांमध्ये राहावे लागत आहे.
राजापेठ पोलिसांच्या ५७ निवासस्थानांची पायाभरणी तर १९२८ सालची असल्याने येथील समस्यांना पारावार उरलेला नाही. त्यामुळे पोलिसांना चांगल्या दर्जाचे शासकीय निवासस्थान मिळावे, यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी (दि. २५) पोलिस आयुक्त राजकुमार व्हटकर जिल्हा पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांनी सविस्तर चर्चा केली.
अमरावती पोलिस दलाचे १९९८ मध्ये अमरावती आयुक्तालय ग्रामीण असे विभाजन झाले. त्यामुळे साहजिकच पोलिसांची संख्या वाढली. असे असले तरी पोलिसांसाठी आवश्यक असलेल्या शासकीय निवासस्थानाची संख्या अपुरी आहे. पोलिसांच्या एकूण संख्येच्या तुलनेत ४० टक्के शासकीय निवासस्थाने असायला हवीत.शहरात राजापेठ, कोतवाली, बडनेरा या ठिकाणी असलेले शासकिय वसाहत या शहर पोलिसांच्या आहे. तसेच मिल्ट्री कॅम्प,
४० टक्के शासकीय निवासस्थान आवश्यक
पोलिसांच्यासंख्येनूसार ४० टक्के शासकीय निवासस्थान असायला हवीत. या अनुषंगाने पोलिस आयुक्त जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यात चर्चा झाली आहे. पोलिसांसाठी नवीन शासकीय वसाहत निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे.त्यापुर्वी आवश्यक जागेची पाहणी करण्यात येईल. किती निवासस्थानांची गरज आहे, किती ठिकाणी बांधकाम करावे, याची माहिती गोळा केली जात आहे. बी.के. गावराने, पोलिस उपायुक्त,अमरावती.
बातम्या आणखी आहेत...