अमरावती - जिल्हातील एक हजार ६५ होमगार्ड्सना नवरात्री, विधानसभा बंदोबस्तासाठीचे सुमारे ७० लाखांच्या वर थकित मानधन मिळालेले नाहीत. गरजेच्या काळामध्ये नेहमीच पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या जवानांना काम करेल त्याच दिवशीचे मानधन देण्यात येते. मानधन थकित झाल्यामुळे या जवानांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे.
वर्षभरामध्ये नवरात्री, पोळा,दिवाळी, दसरा, निवडणूक आदी काळामध्ये पोलिसांना कायदा सुवव्यस्था राखण्याच्या कामी होमगार्ड जवान कर्तव्य बजावतात. पोलिसांच्या मागणीनुसार या जवानांना काम उपलब्ध होत असते. कर्तव्यावर असताना त्यांना दर दिवसाला ४०० रुपयांप्रमाणे मानधन देण्यात येते. त्यांना कायमस्वरूपीकिंवा हक्काचा रोजगार उपलब्ध होत नाही. त्यांना अडीच महिन्यांनंतरही रक्कममिळालेली नाही.
लवकरच मिळणार मानधनाची रक्कम
- नवरात्रीविधानसभा बंदोबस्ताची रक्कम अद्याप जवानांना मिळाली नाही. ही रक्कम वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झाली नाही. त्यासाठी आम्ही महासमादेशक कार्यालयाकडे पाठपुरावा केलेला आहे. लवकरच ही रक्कम मिळेल. प्रा.संजय आसोले, समादेशकहोमगार्ड, अमरावती.
जिल्ह्यातील होमगार्ड जवानांची संख्या
अमरावती ५१३
दर्यापूर १४७
मोर्शी १४१
चांदुर रेल्वे १२५
धारणी ४२
अचलपूर १७८
दिवाळी, दसऱ्यालाही मिळाले नाहीत पैसे
दिवाळी,दसरा यांसारख्या सणाला प्रत्येकच व्यक्तीला सण साजरा करण्यासाठी पैशांची गरज असते. असे असले तरी होमगार्ड जवानांना त्यांच्या हक्काची रक्कम अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे होमगार्ड कर्मचाऱ्यांना दिवाळी, दसराही आर्थिक चणचणीतच साजरा करावा लागला.