आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात जिल्ह्यातील तीन हजार जणांना होतो कॅन्सर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- कॅन्सरसारख्या महाभयंकर आजारामुळे वर्षभरात जिल्ह्यातील तब्बल तीन हजार जणांना कर्करोग होत असल्याचे धक्कादायक वृत्त पुढे आले आहे. मुख गळा, गर्भपिशवी स्तनाचा कर्करोग या तीन कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे.
यामध्ये एकट्या मुख गळापासून होणाऱ्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक ४० टक्के असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पहिला दुसऱ्या स्टेजवर असलेला रुग्ण हमखास बरा होतो, तर तिसऱ्या चौथ्या स्टेजमध्ये असलेल्या रुग्णाची देखील काही प्रमाणात वाचण्याची संधी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास दृढनिश्चयाच्या बळावर हा रोगावरही मात करता येऊ शकते. कर्करोग झाल्यास योग्य निदान करून तत्काळ उपचार केल्यास हा रोग बरा होऊ शकतो. कर्करोगामुळे भयभीत होता, इच्छाशक्तीच्या बळावर याच्याशी सामना करावा. हा आजार बरा होऊ शकतो, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने होणाऱ्या कर्करोगासारख्या महाभयंकर आजाराने देशात दरवर्षी ९० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरात तंबाखू सेवनाच्या प्रमाणात भारताचा अव्वल क्रमांक असून, कर्करोगाचे ४० टक्के रुग्ण हे मुख गळ्याच्या कर्करोगाने पीडित आहेत. शरीराला तंबाखूची गरज नसतेच, केवळ सवयीच्या मानसिकतेतून याचे सेवन केले जाते. याचा फटका रुग्णाला नकळत त्याच्या कुटुंबीयांना बसतो आणि तो कॅन्सरच्या अहारी जातो.
कर्करोग बरा होऊ शकतो, प्रयत्न करा
वेळेवरयोग्य उपचार घेतल्यास पहिल्या दुसऱ्या स्टेजवरील कॅन्सर नक्कीच बरा होऊ शकतो. जनजागृती इच्छाशक्तीची गरज आहे. कर्करुग्ण कल्याण दिवसानिमत्त जे कॉन्सरपीडित रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत, त्यांचा सन्मान स्वागत करण्याचा दिवस आहे. योग्य प्रतिबंधात्मक उपययोजना केल्यास हा आजार नक्कीच बरा होऊ शकतो. रुग्णाने केवळ स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्याला नातेवाइकांनी मदत करावी. डॉ.राजेंद्रसिंह अरोरा, कॅन्सरतज्ज्ञ.कर्करुग्ण कल्याण दिन विशेष