आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमरावतीमध्ये कर्करुग्णांचे प्रमाण देशात सर्वाधिक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शरीरातीलपेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे उद्भवणा-या कर्करोगावर सध्या हमखास उपाय उपलब्ध नसल्याने कर्करुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे वैद्यकीय संशोधनातून पुढे आले आहे. देशातील एकूण लोकसंख्येची घनता विचारात घेता त्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात कर्करुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. संपूर्ण जिल्हा कर्करोगाच्या विळख्यात सापडला असताना या रोगावर आवश्यक अशी आधुनिक उपचार प्रणाली येथे उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपचारासाठी रुग्ण आणि नातेवाइकांची प्रचंड हेळसांड होत आहे.
अमरावती जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. देशाच्या तुलनेत अमरावती जिल्ह्यात कर्करोगाचे प्रमाण दुप्पट आहे. १,५०० लोकसंख्येच्या मागे दोन रुग्ण कर्करोगाचे असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील जवळपास ६३ टक्के लोक तंबाखूच्या आहारी आहेत. चाळिशी गाठलेल्या सर्वच व्यक्तींनी दरवर्षी तपासणी करणे गरजेचे आहे. हा रोग चाळिशीनंतरच
होतो.किंबहुना याचे प्रमाणच चाळिशीनंतरच सर्वाधिक आहे. स्त्रियांनीही चाळिशी झाल्यानंतर गर्भशयाची तपासणी करावी. रोगाचे निदान झाले तर त्यावर उपचार वेळेवर होईल आजारापासून जीव जाणार नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, देशात दरवर्षी दहा लाख लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे होते. यात ४८ टक्के पुरुष, तर २० टक्के महिलांचा समावेश आहे. शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातल्यानंतरही छुप्या पद्धतीने याची विक्री सुरू आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कर्करोगाची जनजागृृती म्हणून शासन दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्ची घालते. मात्र, छुप्या पद्धतीने होणारी तंबाखू तंबाखूजन्य पदार्थाची विक्री दुप्पट आहे. शासनाने संपूर्णपणे यावर बंदी आणली, तर कर्करोगाचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

२०-२० पर्यंत कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट्य : फेब्रुवारी हा दिवस कर्करोग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कर्करोगाची जनजागृती, कर्करोगापासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रोत्साहन, त्याचे निदान त्यावर उपचार आदी महत्त्वपूर्ण कार्य यानिमित्ताने करण्यात येते. युनियन ऑफ कॅन्सर कंट्रोलने या दिवसाची स्थापना केली आहे. जागतिक कर्करोगाचे उद्दिष्ट्य याला मदत करण्यासाठी या कंट्रोल बाेर्डाची स्थापना केली आहे. कर्करोगापासून होणारे आजार त्यामुळे होणारे मृत्यू २०२० पर्यंत कशाप्रकारे कमी करता येईल, हाच कर्करोग दिनाचा मुख्य उद्देश्य आहे.
दरवर्षी १० लाख लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू
*धूम्रपानाचे प्रमाण सर्वाधिक - नॉर्थ ईस्ट प्रदेश
*तंबाखूचे प्रमाण सर्वाधिक - उत्तर प्रदेश बिहार
*गुटखाचे प्रमाण सर्वाधिक - महाराष्ट्र आंध्र प्रदेश

कर्करोगाची लक्षणे
- स्तन किंवा अन्यत्र गाठ होणे
- वांग किंवा तिळामध्ये अनपेक्षित बदल
- अपचन किंवा गिळण्यास अवघड
- तोंडाच्या पोकळीमध्ये लाल, पांढरा चट्टा असणे
- चावणे, गिळणे, बोलण्यास अवघड जाणे
- जीभ बाहेर काढण्यास अवघड जाणे
- थकवा
- अकारण वजन कमी होणे
- सतत ताप येणे
- मलविसर्जन प्रक्रियेत बदल
- असामान्य रक्तस्राव किंवा स्राव, घट्ट होणे किंवा गुठळ्या होणे
- तोंडाचा कर्करोग ५-७ टक्क्यांनी देशाच्या तुलनेत सर्वाधिक
- लाख लोकसंख्येमागे १२ जणांना तोंडाचा कर्करोग
- स्तन कर्करोग ४-५ टक्क्यांनी देशाच्या तुलनेत अधिक
- लाख लोकसंख्येमागे १८ स्त्रियांना स्तनाचा कर्करोग
- स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग ४-६ टक्क्यांनी अधिक
- लाख लोखसंख्येमागे २५ स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग
- १५०० लोकसंख्येमागे कर्करोगाचे दोन रुग्ण

२००० लोकसंख्येमागे कर्करोगाचा रुग्ण
देशाच्या तुलनेत एकट्या अमरावती जिल्ह्यात तंबाखूचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे ६३ टक्के लोकं तंबाखूच्या आहारी आहेत. धूम्रपानाच्या तुलनेत जिल्ह्यात तंबाखूचे प्रमाण सर्वाधिक आहे, तर मेळघाटात विडीचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी एनसीडीतर्फे विविध उपक्रम राबवले जातात. जिल्ह्यातील कर्करोगाचे प्रमाण कमी करणे, हेच ध्येय आहे. सी.एल. सोनकुसरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एनसीडी.
तंबाखूच्या आहारी जिल्ह्यात १,२०० रुग्ण
जिल्हासामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे (एनसीडी) जिल्हा कार्यक्रम अधिकारी सी. एल. सोनकुसरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात कर्कराेगाने पीडित रुग्णांची तपासणी करण्यात आली. आतापर्यंत १० लाख लोकांची यामध्ये तपासणी झाली. त्यांपैकी १,२०० रुग्ण हे कर्करोगाने पीडित आहे, तर ३,००० संशयित रुग्ण असल्याचे सूत्रांनी सांिगतले. हा आकडा केवळ एवट्या अमरावती जिल्ह्याचा आहे.