आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नकारात्मक बातमी: पावणेचार लाखांचा गांजा जप्त, दोघांना केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एका वाहनातून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून, यावेळी आरोपीच्या ताब्यातून टाटा सुमो वाहनासह २९ किलो गांजा जप्त करण्यात आला. नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालखडी मार्गावर रविवारी पहाटे सापळा रचून पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गांजा तस्करांचे धाबे दणाणले आहे. अब्दुल जावेद अब्दुल रफीक (२२ रा. लालखडी) शे. अकबर शे. हुसेन (४५ रा. हैदरपुरा,अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
एका टाटा सुमो वाहनातून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहरात मोठ्या प्रमाणावर गांजा येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे तीन अधिकारी बारा कर्मचाऱ्यांची चमू शनिवारी रात्री १० वाजतापासून लालखडी मार्गावर सापळा रचून होती. माहितीप्रमाणे रविवारी पहाटेच्या सुमारास एक टाटा सुमो आली. पोलिसांनी वाहन थांबवून वाहनाची झडती घेतली. त्यावेळी चालकाच्या सीटखाली एक मागील दोन सीटखाली दोन असे तीन पोती मिळाले. ती पोती उघडून पाहिले असता त्यामध्ये दोन दोन किलोचे पॅकींग केलेला गांजा मिळून आला. या गांजाचे वजन केले असता तो २९ किलो ५० ग्रॅम होता. अकोला मार्गावरील एका ठिकाणाहून हा गांजा शहरात चिल्लर विक्री करण्यासाठी आला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
चिल्लर विक्रीमध्ये गाजांची प्रतिकिलो १२ हजार रुपये सध्या किंमत आहे. तसेच ठोक दराप्रमाणे हजार रुपये किलो आहे. पोलिसांनी ठोक दराप्रमाणे लाख ७५ हजार रुपयांचा गांजा दोन लाख रुपयांची टाटा सुमो असा एकूण लाख ७५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी दोघांविरुध्द एनडीपीएस कायद्या अन्वये गुन्हे दाखल करून अटक केली आहे.
मुख्य सूत्रधार कोण? : हागांजा शहरात कोणासाठी येत होता? हे वाहन कोणाचे आहे, शहरात अशा प्रकारे किती गांजा आला आहे, अशी माहिती घेण्याचे काम पोलिस करत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक रियाजोद्दीन देशमुख यांच्या नेतृत्वात एपीआय अतुल वर, पीएसआय नितीन थोरात गुन्हे शाखेच्याच बारा कर्मचाऱ्यांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...