आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव कारच्या तीन पलट्या, सहा जण जखमी, देवीच्या दर्शनावरून परतताना घडला अपघात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या भाविकांची भरधाव कार अपघातग्रस्त होऊन तीन पलट्या घेतल्या. बडनेरावरून आठ किमी पुढे बंद टोलनाक्यावर बुधवारी सकाळी घडलेल्या या अपघातात कारचालकासह सहा जण जखमी झाले. जखमींपैकी एक महिला गंभीर असून, सर्व जखमींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोनाली तऱ्हानेकर (रा. इंदोर), अनघा आनंद खांडेकर, वनिला खांडेकर, अर्चना खांडेकर (रा. नागपूर), अनिल तऱ्हानेकर आणि कारचालक अनिल सोळंके (रा. इंदोर) अशी जखमींची नावे आहेत. तऱ्हेकर आणि खांडेकर कुटूंबीय देवीचे दर्शन घेऊन बुधवारी सी. जी. ०७ एमबी ८८४४ क्रमांकाच्या कारने नागपूरला जात होते. टोलनाक्यावर चालकाचे संतुलन बिघडल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी कारचा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती -बडनेरा एक्स्प्रेस हायवेवरील घडलेल्या या अपघातानंतर कारची अशी अवस्था झाली होती.