आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cardiac, Depression Become Big Diseases In 2020 Year

हृदयविकार, डिप्रेशन असतील सन २०२० मधील मोठे आजार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - धकाधकीचे जीवन, वाढत जाणारी स्पर्धा, आपले अस्तित्व आणि वर्चस्व टिकवण्यासाठी करावी लागणारी धडपड यामुळे २०२० मध्ये हृदयविकार, जनरलाइज एन्झायटी आणि मेजर डिप्रेशन हे आजार जगातील ‘टॉप टेन’ आजारांमध्ये पहिल्या तीन क्रमांकांवर येणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भविष्यात जगातील भारतातील ‘टॉप टेन’ आजारांची यादीच तयार केली आहे.

डब्ल्यूएचओने तयार केलेल्या या अहवालाच्या आधारावर संबंधित आजारांवर काम करणाऱ्या वैद्यकीय संस्थांनी त्यावर उपाय शोधणे सुरू केले आहे, तर औषध कंपन्यांनी आपल्या उत्पादनात वाढ करण्यास सुरुवात केली आहे.

या संदर्भात अकोल्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अनुप राठी यांनी अमरावतीत ‘दिव्य मराठी’शी चर्चा करताना ही माहिती दिली. जिनिव्हा येथे जागतिक आरोग्य संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात हा अहवाल सादर केला. सुमारे २०११ पासून या अहवालावर काम सुरू होते.

पुढे वाचा... वाढीची कारणे