आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीबाधितांना ‘केअर अँन्ड सपोर्ट’चा ‘आधार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- एचआयव्हीबाधित व्यक्तींची काळजी घेऊन त्यांना आधार देण्यासाठी आधार संस्था सरसावली आहे. जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या ‘केअर अँड सपोर्ट’ केंद्राचे शनिवारी जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी उद्घाटन केले. या केंद्राद्वारे एचआयव्हीबाधित व्यक्तींना आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.

शहरातील आधार ही समाजिक संस्था मागील सात वर्षांपासून एचआयव्हीबाधितांसाठी काम करते. ‘विहान’ प्रकल्पांतर्गत संस्थेने नव्यानेच केअर अँड सपोर्ट केंद्र सुरू केले. याद्वारे एचआयव्हीबाधितांना औषधोपचाराची माहिती देणे, शासकीय योजनांची माहिती व लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, औषध सेवनाची टाळाटाळ करणार्‍या रुग्णांना समुपदेशन व मानसिक आधार देणे हे उद्देश ठेवण्यात आले आहेत. एचआयव्हीबाधित महिलांना शिलाई मशीनद्वारे काम करण्याची संधी तसेच त्यांच्या बालकांच्या खेळण्याची सोय या केंद्रामध्ये करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या अध्यक्ष विद्या तायडे यांनी सांगितले.

केअर अँड सपोर्ट केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनी, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी अजय साखरे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आरोग्य प्रसारक मंडळाचे डॉ. रघुनाथ वाडेकर, डॉ. प्रशांत काळबांडे, पवन निंभोरकर, संस्थेचे सचिव गजानन धर्माळे, गोविंद कासट, संजय राऊत, नीता पापडकर, सारंग आगरकर, अभिषेक पाटील, सारिका धर्माळे, किशोर गुप्ता, अनिल माहुरे, राहुल भोरगडे, जयर्शी नागपुरे, ममता राणे यांच्यासह अन्य उपस्थित होते.